PHOTO : अभिनयाचा 21 वर्षांचा प्रवास मांडण्यासाठी संदीप पाठक यांची वेबसाईट लाँच

Feature_Photo_1

1/8
अभिनेता संदीप पाठकने आपल्या चाहत्यांसाठी नुकतीच एक वेबसाईट लाँच केली असून www.sandeeppathak.in वर वेगवेगळ्या देशांतून चाहते मोठ्या प्रमाणात भेट देत आहेत.
2/8
मराठीतील हरहुन्नरी कलाकार संदीप पाठकने आपल्या चाहत्यांच्या आणि प्रेक्षकांच्या संपर्कात राहण्यासाठी स्वत:ची वेबसाईट सुरु केली आहे.
3/8
संदीप पाठक मराठीतील एक गुणवंत कलाकार म्हणून ओळखला जातो.
4/8
संदीप पाठकला मुंबईत येऊन गेल्या महिन्यात 21 वर्षे पूर्ण झाली आहेत.
5/8
21 वर्षांपूर्वी मुंबईत एक बॅग घेऊन आलेल्या संदीप पाठककडे केवळ त्याची कला होती, ती सादर करण्यासाठी तो वेगवेगळे मार्ग शोधत होता.
6/8
आज 21 वर्षांनंतर आपल्याला अनेक गोष्टी करता आल्या, सिनेमा आणि नाटकाच्या माध्यमातून आपल्याला प्रेक्षकांचं प्रेम मिळाल्याच्या भावना संदीप पाठकने व्यक्त केल्या.
7/8
आपल्या आतापर्यंतच्या कामाचा लेखाजोगा मांडण्यासाठी आणि भविष्यातील कामाची माहिती प्रेक्षकांना देण्यासाठी आपण वेबसाईट सुरु केल्याचं संदीप पाठकने म्हटलं आहे.
8/8
संदीप पाठकच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होताना दिसत आहे.
Sponsored Links by Taboola