PHOTO : बारीक केस अन् नाकात रिंग, ‘तारक मेहता..’ फेम ‘सोनू’चा भन्नाट मेकओव्हर!
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या लोकप्रिय मालिकेत ‘सोनू आत्माराम भिडे’ ही व्यक्तिरेखा साकारत घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री निधी भानुशाली (Nidhi Bhanushali) सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनिधी सध्या अभिनय विश्वाला रामराम ठोकून, भटकंतीचा आनंद लुटत आहे. मात्र, सध्या ती तिच्या नव्या लूकमुळे प्रचंड चर्चेत आली आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतून निधी केव्हाच बाहेर पडली असली, तरी तिच्या चाहत्यांची संख्या मात्र कधीच कमी झाली नाही.
सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असणारी निधी भानुशाली आपले वेगवेगळे फोटो नेहमी शेअर करत असते. तिच्या बोल्ड लूकचीही चर्चा चाहत्यांमध्ये सुरु असते.
मात्र, आता निधीने एकदम हटके मेकओव्हर केला आहे. निधीने तिचे केस एकदम बारीक कापले असून, टॉमबॉय लूक केला आहे. नाकात छोटीशी रिंग परिधान केली आहे. निधीच्या या लूकलाही चाहत्यांची पसंती मिळत आहे.
निधीचा हा टॉमबॉय लूक तिच्या काही चाहत्यांना आवडला आहे. तर काही चाहते मात्र तिच्यावर टीका करत आहे. काहींनी तर तिला थेट इन्स्टाग्रामवर अनफॉलो करण्याची धमकी दिली आहे.
तर, काहींनी तिचा हा हेअरकट अतिशय वाईट दिसत असल्याचे म्हटले आहे. अनेकांना तिचा हा लूक फारसा पसंत पडलेला नाहीये. निधी नेहमीच आपल्या लूकसोबत काहीतरी नवे प्रयोग करत असते. (Photo : @Nidhi Bhanushali/IG)