Exit Poll 2024
(Source: Poll of Polls)
PHOTO : भरपावसात आदित्य ठाकरे यांचा शिवसैनिकांशी संवाद
शिवसेना आमदार आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी काल सायंकाळी वडाळ्यातील शिवसेना शाखा क्र. 178 इथ केलेलं भाषण चांगलंच चर्चेत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयाचं कारण म्हणजे त्यांच्या भाषणाच्या वेळी जोरदार पाऊस सुरु होता, आणि या भरपावसात त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला.
राज्यात सुरु असलेल्या सत्तानाट्याला आज एक महिना झाला. राग येण्यापेक्षा दुःख वाटतंय. ज्यांना भरभरुन दिलं, त्यांनी पाठीत खंजीर खुपसला. आम्ही कुणाचं वाईट केलं नाही, म्हणून ताठ मानेने उभे आहोत, ते म्हणाले.
विशेष म्हणजे शिवसेना आमदारांच्या बंडखोरीनंतर आदित्य ठाकरे चांगलेच आक्रमक झाले आहेत. भर पावसातही शिवसैनिकांनी दिलेला प्रतिसाद आनंददायक होता, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
दरम्यान आमदार आदित्य ठाकरेंनी काल मुंबईतील आग्रीपाडा येथे आयोजित कार्यक्रमातही संवाद साधला. भायखळा आग्रीपाडा येथील शिवसेना शाखा क्र. 212 ला भेट दिल्याचं ट्वीट त्यांनी केलं.
गेलेले लपूनछपून, शिवसैनिकांना त्रास देत आहेत. परत येणाऱ्यांसाठी मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत. लाज असेल तर राजीनामा द्या आणि निवडणूक लढवा. आमचा कायद्यावर विश्वास आहे. हे सरकार पडणारच. ठाकरे परिवार आणि शिवसेना संपवायला हे निघाले आहेत, असंही ते म्हणाले.
या निष्ठा यात्रेत आदित्य ठाकरे बंडखोर खासदार आणि आमदारांच्या मतदारसंघातील शिवसेनेच्या शाखांनाही भेट देत आहेत. यावेळी ते गटप्रमुख, शाखाप्रमुख आणि शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत. या निष्ठा यात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून सेनेतील निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना बळ देण्याचाही प्रयत्न केला जात आहे.