PHOTO : अक्कासाहेबांच्या कल्याणीचा खणाच्या साडीतील सोज्वळ लूक, पाहा जुई गडकरीचे क्लासी फोटो
पुढचं पाऊल फेम अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) ही नेहमीच सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. (@juigadkariofficial/Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या जुई रुपेरी पडद्यापासून लांब असली तरी आपल्या क्लासी फोटोंमुळे ती नेहमीच चर्चेत असते. (@juigadkariofficial/Instagram)
जुई गडकरी पारंपरिक लूकमधील आपले फोटो नेहमीच शेअर करत असते. असेच खणाच्या साडीतील जुईचे काही फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. (@juigadkariofficial/Instagram)
जुई गडकरीला पुढचं पाऊल या मालिकेनं विशेष ओळख मिळवून दिली. अक्कासाहेबांची आवडती सून कल्याणी म्हणून अवघ्या महाराष्ट्रानं जुईला खूप प्रेम दिलं. (@juigadkariofficial/Instagram)
पुढचं पाऊल मालिकेतील अक्कासाहेबांची सूनेची भूमिका साकारणारी कल्याणी म्हणजेच, सालस चेहरा, केसात गजरा आणि आदर्श सून. जुईनं आपल्या भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली. (@juigadkariofficial/Instagram)
जुई गडकरीने बाजीराव मस्तानी या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यानंतर पुढचं पाऊल, माझिया प्रियाला प्रित कळेना, तुझवीन सख्या रे या मालिकांसह बिग बॉस मराठी या रिअॅलिटी शोमधूनही जुई प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. (@juigadkariofficial/Instagram)
(@juigadkariofficial/Instagram)