Star Pravah Puraskar 2023 : मराठी परंपरा विथ अ ट्विस्ट, रेड कार्पेटवर कलाकारांचा हटके अंदाज
स्टार प्रवाह वाहिनीचा 'स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2023' नुकताच जल्लोषात पार पडला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमराठी परंपरा विथ अ ट्विस्ट अशी थीम असल्यामुळे रेड कार्पेटवर कलाकारांचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला.
पारंपरिक पोशाखाला आधुनिकतेची जोड देत कलाकारांनी खऱ्या अर्थाने सोहळ्याची शान वाढवली.
एरव्ही आपण या सर्वच कलाकारांना त्यांच्या व्यक्तिरेखांच्या रुपात भेटत असतो.
मात्र या सोहळ्याच्या निमित्ताने प्रवाह परिवारातल्या लाडक्या कलाकारांचं हे नवं रुप लक्षवेधी ठरलं
अरुंधती, संजना, अनिरुद्ध, गौरी, जयदीप, शालिनी, पल्लवी, शांतनू, भूमी, आकाश, अप्पू, शशांक, दीपा, कार्तिक, सौंदर्या या सगळ्याच कलाकारांचा हटके अंदाज कौतुकास्पद होता.
स्टार प्रवाह वाहिनीवर रविवारी 19 मार्चला स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2023 पाहायला मिळणार आहे.
यंदा कोणते कलाकार पुरस्कारावार विजेतेपदाची मोहोर उमटवणार आहेत याची उत्सुकता आहे.