Pooja Bhatt Birthday: कधी वडिलांना लिप किस तर कधी बॉडी पेंट, वादांनी भरलेले आहे पूजा भट्टचे आयुष्य
Pooja Bhatt Birthday: तिच्या प्रत्येक स्टाईलवर चाहते घायाळ हॉट होते, मात्र तिचं संपूर्ण आयुष्य वादांनी भरलेलं आहे. ती अभिनेत्री आहे पूजा भट्ट. आज तिचा वाढदिवस आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App24 फेब्रुवारी 1972 रोजी मुंबईत जन्मलेल्या पूजा भट्टच्या घरात लहानपणापासूनच फिल्मी वातावरण होते. तिचे वडील महेश भट्ट हे स्वत: प्रसिद्ध चित्रपट निर्माता-दिग्दर्शक आहेत.
पूजा 17 वर्षांची असताना ती एका मोठ्या चित्रपटाची नायिका बनली. या चित्रपटाचे नाव डॅडी असं होतं. ज्याची निर्मिती तिचे वडील महेश भट्ट यांनी केली होती.
यानंतर तिने दिल है के मानता नहीं, सडक, सर, हम दोनों आणि चाहत यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केले. या चित्रपटतील तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली.
पूजाने जेव्हाही चित्रपटांमध्ये काम केले तेव्हा तिच्या कामाचे नेहमीच कौतुक झाले. मात्र यापेक्षा जास्त चर्चा झाली ती तिच्या वैयक्तिक आयुष्याची.
पूजाने आपल्या वडिलांना किस करताना फोटोशूट केले होते. दोघांचे हे फोटो एका मासिकात प्रसिद्ध झाले होते.
या फोटोवरून बराच वाद झाला होता. महेश भट्ट यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
2003 मध्ये पूजा भट्टने 'पाप' चित्रपट दिग्दर्शित केलं होतं. यादरम्यान तिचे मनीष मखीजा सोबत संबंध होते, जे लग्नानंतर घटस्फोटापर्यंत पोहोचले.