Bigg Boss Winner : करणवीर मेहराकडून सिद्धार्थ शुक्लाच्या विक्रमाशी बरोबरी, बिग बॉस 18 जिंकून मारली बाजी
Bigg Boss Season 18 : छोट्या पडद्यावरील सलमान खानच्या प्रसिद्ध शोचा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. बिग बॉस 18 चा ग्रँड फिनाले 19 जानेवारीला धूमधडाक्यात पार पडला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयासोबतच बिग बॉस 18 सीझनचा चॅम्पियन मिळाला आहे. अभिनेता करणवीर मेहरा यंदाच्या सीझनचा विजेता ठरला आहे, तर विवियन डिसेना उपविजेता ठरला आहे.
बिग बॉस 18 विजेत्याच्या शर्यतीत विवियन डिसेनाचं नावही आघाडीवर होतं. मात्र, विवियन डिसेनाला झटका देत करणवीर मेहराने बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरलं.
बिग बॉस सीझन 18 विजेता करणवीर मेहराला बिग बॉस 18 ची ट्रॉफी आणि 50 लाख रुपये बक्षीस मिळालं आहे.
बिग बॉस जिंकून अभिनेता करणवीर मेहरा याने दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याच्या कामगिरीची बरोबरी केली आहे.
करणवीर मेहराने 'खतरों के खिलाडी' शोनंतर 'बिग बॉस 18' शोच्या ट्रॉफीवर नाव कोरलं.
करणवीर मेहरा दोन टेलिव्हिजन जिंकणारा दुसरा सेलिब्रिटी ठरला आहे. याआधी सिद्धार्थ शुक्लाने खतरों के खिलाडी आणि बिग बॉस हे दोन्ही शो जिंकले आहेत.
बिग बॉस 18 शोच्या टॉप 5 फायनलिस्टमध्ये रजत दलालचं नावही सामील होतं.
करणवीर मेहरा बिग बॉस 18 च्या विजेता ठरल्यामुळे विवियन डिसेनाच्या चाहत्यांचा हिरमोड झाला आहे.