Share Market : विदेशी गुंतवणूकदारांची सावध चाल, भारतीय शेअर बाजारातून जानेवारीत 44396 कोटी रुपये काढले
विदेशी गुंतवणूकदारांकडून गेल्या चार वर्षांपासून जानेवारी महिन्यात भारतीय बाजारातून पैसे काढून घेण्याचा ट्रेंड सुरु आहे. यंदा देखील भारतीय शेअर बाजारातून जानेवारीत मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी पैसे काढून घेतले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमेरिकेतील बदललेली राजकीय स्थिती, डॉलरचं मजबूत होणं, अमेरिकेत बॉण्ड यील्ड्समध्ये वाढ होणं, याशिवाय भारतीय शेअर बाजारातील कमजोर स्थिती यामुळं इक्विटीमधून विदेशी गुंतवणूकदारांनी 44396 कोटी रुपये काढून घेतले आहेत.
डिसेंबर महिन्यात विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी 45446 कोटी रुपये काढून घेतले होते, त्या तुलनेत जानेवारी महिन्यात तिप्पट रक्कम काढून घेण्यात आली आहे. जागतिक आणि देशांतर्गत स्थिती पाहता विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून पैसे काढून घेतले आहेत.
भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत निचांकी पातळीवर असल्यानं विदेशी गुंतवणूकदारांवर इक्विटी बाजारातून पैसे काढून घेण्याचा दबाव वाढल्याचं मॉर्निगस्टार इन्वेस्टमेंट अॅडव्हायजर्स इंडियाचे कार्यकारी संचालक हिमांशु श्रीवास्तव यांनी म्हटलं.
भारतीय इक्विटीजचं अधिक मूल्यांकन हे देखील एक कारण असल्याचं सांगितलं जातंय. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या वेगासंदर्भातील अनिश्चितता हे देखील एक कारण समोर आलं आहे. आकडेवारीनुसार विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी 17 जानेवारीपर्यंतच्या आकडेवारीनुसार 44396 कोटी रुपये काढून घेतले आहेत. 2 जानेवारी या दिवशी विदेशी गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेतले नव्हते. ((टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.))