'ती' हिरोईन प्रेमात पडली अन् करिअरच संपलं, चुकीच्या व्यक्तीमुळे आयुष्याचं वाटोळं, हादरवणारी प्रेमकहाणी!
कधीकाळी मोनिका बेदी हे नाव सगळीकडे ओळखीचं होतं. या अभिनेत्रीला अख्खा भारत ओळखायचा. तिने बॉलिवुडमध्ये आपला जम बसवला होता. मात्र चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केल्यामुळे तिचं सगळं आयुष्यच बदलून गेलं. या प्रेमामुळे तिचं संपूर्ण करिअरच संपून गेलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमोनिका बेदी या अभिनेत्रीला बॉलिवुडने प्रसिद्धी आणि पैसा असं दोन्ही दिलं होतं. मोनिक बेदीचा जन्म पंजाब राज्यातील होशियारपूर इथे झाला. पंजाब सोडून ही मोनिका अभिनय करण्यासाठी मुंबईत आली होती. सुरुवातीला या अभिनेत्रीने आपले सौंदर्य आणि अभिनयाने सर्वांचच मन जिंकलं होतं. पण अंडरवर्ल्डचा डॉन अबू सालेमच्या प्रेमात पडल्यानंतर तिचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं.
बॉलीवुडमध्ये नाव कमवल्यानंतर कालांतराने ती डॉन अबू सालेमच्या संपर्कात आली. दोघांमध्ये मैत्री झाली आणि पुढे मोनिका बेदी सालेमच्या प्रेमात पडली.
मोनिका बेदीच्या करिअरला 1995 साली सुरुवात झाली. तिने आतापर्यंत अनेक चित्रपटांत काम केलेलं आहे. तिच्या ग्लॅमरस लूकचे लाखो लोक दिवाने होते. तिने जोडी नंबर-1 या चित्रपटात केलेल्या कामाची चांगलीच प्रशंसा झाली.
मात्र अबू सालेमच्या प्रेमात पडल्यानंतर तिच्या आयुष्यात अडचणींचा डोंगर उभा राहिला. तिला 2002 साली पोर्तुगालमध्ये अबू सालेमसोबत अटक करण्यात आली होती.
बनावट पासपोर्टसोबत मोनिकाल तेथे अटक करण्यात आले होते. या कारणामुळे तिला तुरुंगातही राहावे लागले. या प्रसंगाबाबत 2014 साली खु्द्द मोनिका बेदीनेच एका मुलाखतीत भाष्य केलं होतं. ‘अबू सालेमने तो उद्योजक असल्याचे मला सांगितले होते. आम्ही सुरुवातीला साधारण 9 महिने एकमेकांशी फोनवरून गप्पा मारल्या. त्यानंतर आमची पहिली भेट दुबईत झाली. आमची दुबईत जेव्हा भेट झाली, तेव्हा त्याने मला त्याच्याबाबत सगळंकाही खरं सांगितलं होतं, अशी माहिती तिने दिली होती.
पोलिस त्यावेळी त्याला एका खुनाच्या खटल्यात शोधत होते. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मी त्याच्या खूप प्रेमात पडले होते. एवढंच नाही तर आम्ही लग्नदेखील केलं होतं, असं तिने सांगितलं होतं.
दरम्यान, 2005 साली मोनिका आणि अबू सालेम यांना पोर्तुगालवरून भारतात आणण्यात आलं होतं. 2007 साली मोनिकाला जामीन मिळाला होता. सध्या ती तुरुंगाच्या बाहेर असून सामान्य आयुष्य जगतेय. ती सोशल मीडियावर चांगली सक्रिय असते.