In Pics: 'मन उडु उडु झालं' मालिकेतून दिला गेला सामाजिक संदेश
दिवाळी सणाचा उत्साह सध्या सगळीकडे पाहायला मिळत आहे. मालिकेतदेखील हा सण साजरा होताना प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. (Photo:@man_udu_udu_jhal/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'मन उडु उडु झालं' मालिकेत सामाजिक भान राखत एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. (Photo:@man_udu_udu_jhal/IG)
मालिकेतील देशपांडे कुटुंबीय फटाके न फोडता फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी रोप लावायची सुरुवात आपल्या घरापासून केली पाहिजे, असा संदेश देताना दिसले.(Photo:@man_udu_udu_jhal/IG)
मालिकेत देशपांडे सर घरी कोरफड, जरबेरा आणि नाग वनस्पती आणतात. ही रोपं हवेतील प्रदूषण शोषून घेतात. माणूस म्हणून आपण निसर्गाला काहीतरी देणं लागतो आणि म्हणूनच देशपांडे कुटुंबीय फटाके न फोडता आपल्या घरात ही रोपं लावतात. (Photo:@man_udu_udu_jhal/IG)
फटाके फोडू नका आणि फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी झाडं लावा, असा चांगला संदेश मालिकेतून देण्यात आला आहे. (Photo:@man_udu_udu_jhal/IG)
लाडक्या कलाकारांना नेहमी चाहते आणि रसिक प्रेक्षक फॉलो करतात त्यामुळे मालिकेत दिलेला चांगला संदेश सुद्धा ते आचरणात आणतील. त्यामुळेच मालिकेने सामाजिक भान राखत एक चांगला बदल घडवण्याची सुरुवात केली आहे. (Photo:@man_udu_udu_jhal/IG)