In Pics: मंगेश बोरगावकरने दिली सांगितिक दिवाळीभेट
कोरोनाचा प्रादुर्भाव काही अंशी कमी झाल्याने यंदा दिवाळी सण सगळीकडे उत्साहात साजरा होत आहे. कलाकारांसाठी देखील ही दिवाळी उत्साहवर्धक आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आणि कोरोनाकाळातील नैराश्य दूर करण्यासाठी सुप्रसिद्ध गायक मंगेश बोरगांवकर आपल्या रसिकांसाठी एक खास सांगीतिक मेजवानी घेऊन आला आहे.(Photo:@MangeshBorgaonkarOfficial/FB)
'उजळे पणती' हे दिवाळीचं अत्यंत सुंदर वर्णन करणारं गाणं घेऊन मंगेश रसिकांसमोर आला आहे.(Photo:@MangeshBorgaonkarOfficial/FB)
या गीताची रचना डॉ रामेश्वरी अल्हाबादे यांची असून संगीत मिहीर थत्तेने केले आहे. (Photo:@MangeshBorgaonkarOfficial/FB)
मंगेशचा प्रसन्न व गोड आवाज या गीताचे सौंदर्य आणखी खुलवतो आहे. (Photo:@MangeshBorgaonkarOfficial/FB)
दिवाळीच्या फराळासोबत मंगेश बोरगावकरच्या 'उजळे पणती' या गाण्याने दिवाळी गोड होणार, अशी दाद श्रोत्यांकडून मिळत आहे.(Photo:@MangeshBorgaonkarOfficial/FB)