मुक्काम पोस्ट 'शिवतीर्थ'! राज ठाकरे नवीन घरात शिफ्ट, पाहा कशी आहे पाच मजली इमारत
Raj Thackeray New House Shivtirth Update : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS Chief) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज भाऊबीजेच्या मुहूर्तावर नव्या घरात प्रवेश केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमित ठाकरे यांनी आज या नव्या घराच्या नामफलकाचं उद्घाटन केलं.
राज ठाकरेंच्या या नव्या घराचं नाव असणार आहे शिवतीर्थ. दादर येथील 'कृष्णकुंज'शेजारीच नवी पाच मजली इमारत बांधण्यात आली आहे. यामध्ये राज ठाकरे आज कुटुंबासह गृहप्रवेश करणार आहे.
थोड्याच वेळात राज ठाकरे यांच्या नव्या शिवतीर्थ वास्तुच्या वरती भगवा झेंडा फडकावत प्रवेश करतील. यासाठी जय्यत तयारी सध्या सुरू आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून राज ठाकरे आणि त्यांचा परिवार कृष्णकुंज निवासस्थानी राहत आहेत. कृष्णकुंजवर अनेक ऐतिहासिक घडामोडी घडल्या.
आता राज ठाकरे हे शिवतीर्थ या 5 मजल्याच्या इमारतीत राहायला जाणार आहेत