PHOTO : 'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेत लगीनघाई, सरु-सूर्याचं पुन्हा धूमधडाक्यात लग्न
स्टार प्रवाहवरील 'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेत सध्या उत्सुकता आहे ती सरु आणि सुर्याच्या लग्नाची. या दोघांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने संपूर्ण कुटुंबाने त्यांचं लग्न पुन्हा एकदा धुमधडाक्यात करण्याचं ठरवलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमालिकेच्या नावाप्रमाणेच सहकुटुंब सहपरिवाराच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याने पुढाकार घेत लग्नाची जय्यत तयारी केली आहे. त्यामुळे मालिकेत पुन्हा एकदा सरु आणि सूर्याचा विवाहसोहळा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
लग्नाच्या निमित्ताने मोरे कुटुंबात उत्साहाचं वातावरण आहे. अंजी पश्या आणि अवनी वैभवचा खास डान्स परफॉर्न्सही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
एकीकडे आनंदाचं जरी वातावरण असलं तरी अवनी आणि वैभवच्या नात्यातला तणाव मात्र कायम आहे.
अवनी आई होणार आहे. मात्र आत्याने दिलेली जॉबची ऑफर वैभवने स्वीकारली तरच ती या मुलाला जन्म देईल अशी अट अवनीने घातली आहे. त्यामुळे वैभव नेमका काय निर्णय घेणार याची उत्सुकता आहे.
त्यामुळे 'सहकटुंब सहपरिवार' मालिकेचे यापुढील भाग मनोरंजनाने परिपूर्ण असणार आहेत.