In Pics : पंचगंगा-कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ, कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात सतत बसरणाऱ्या पावसामुळे पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंचगंगा नदीची पाणी पातळी 33 फुटांवर पोहोचली असून कोल्हापूरातील 59 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
राधानगरी धरणातून पाणी विसर्ग सुरु असून अनेक रस्त्यांवरील वाहतूक बंद झाली आहे. ज्या ठिकाणी पाणी आलं असेल त्याठिकाणी वाहतूक करु नये असं प्रशासनाने सांगितलं आहे.
पंचगंगेच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याने नरसोबावाडीमधील दत्त मंदिर पाण्याखाली गेलं आहे. श्री क्षेत्र नृसिंहवाडी मधील श्रीदत्त मंदिरात यंदाचा पहिला दक्षिणद्वार सोहळा शुक्रवारी पहाटे 2 वाजता संपन्न झाला.
सांगलीतील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली असून ती आता 23 फुटांवर पोहोचली आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
सांगलीत पावसाने आज उसंत घेतली असली तरी कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरु झाल्यास या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर आणि सांगलीत पावसाचा जोर असाच राहिला तर पंचगंगा आणि कृष्णा धोक्याची पातळी गाठण्याची शक्यता आहे.