PHOTO : वयाच्या 42व्या वर्षांत पदार्पण करणारी श्वेता तिवारी आजही दिसते तरुण! अभिनेत्रीबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत का?
छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी आज (4 ऑक्टोबर) आपला वाढदिवस साजरा करत आहे. श्वेता आत्तापर्यंत अनेक टीव्ही मालिकांमध्ये झळकली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएक उत्तम कलाकार असण्यासोबतच, ती एक सशक्त स्त्री देखील आहे, हे तिने अनेकदा सिद्ध केले आहे. व्यावसायिक जीवनातील संघर्षाव्यतिरिक्त, श्वेताने तिच्या वैयक्तिक आयुष्यातही बरेच चढ-उतार पाहिले आहेत.
श्वेता तिवारीने अगदी लहान वयातच काम करायला सुरुवात केली होती. वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी ती एका ट्रॅव्हल एजन्सीत काम करायची.
या कामासाठी तिला फक्त 500 रुपये मानधन मिळायचे. मात्र, आपण अभिनेत्री व्हायचे हे स्वप्न तिने उराशी बाळगले होते. अभिनेत्री बनण्यासाठी तिने कठोर मेहनत केली अखेरीस तिच्या मेहनतीचे फळ तिला मिळाले.
श्वेता तिवारीला टीव्ही मालिका 'कसौटी जिंदगी की' मधून घराघरांत ओळख मिळाली. पण, तिने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 'कलीरें' या टीव्ही मालिकेतून केली होती.
या मालिकेतून तिला फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. नंतर ती 'आने वाला पल' आणि 'कहीं किसी रोज' सारख्या मालिकांमध्ये झळकली.
अभिनेत्रीने ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेत प्रेरणाची भूमिका साकारली होती. या पात्राचे लोकांना खूप कौतुक केले होते.
कधीकाळी अवघे 500 रुपये कमावणारी श्वेता ही आजघडीला टीव्हीवरील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री बनली आहे. मालिकेच्या एका एपिसोडसाठी ती सुमारे 60 ते 70 हजार रुपये मानधन घेते.
अभिनेत्री श्वेता तिवारी वयाच्या 16व्या वर्षी पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर आली होती. वयाच्या 16व्या वर्षी तिला एका जाहिरातीसाठी कास्ट करण्यात आले होते. (Photo : @ shweta.tiwari/IG)