Navratri 2022 : आठव्या माळेला रुक्मिणी माता दुर्गादेवीच्या सजली रुपात, पाहा फोटो
शारदीय नवरात्रीचा आठव्या दिवशी रुक्मिणी माता दुर्गादेवीच्या रुपात सजली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतर विठुरायला मौल्यवान पारंपरिक अलंकारात आणि पोशाखात सजविण्यात आले आहे
दुर्गादेवीच्या रुपात सजलेलल्या रुक्मिणी मातेचं रूप अधिक खुलून दिसत होते
मातेला सजवताना सोन्याचा मुकुट, लहान सरी , मोठी नथ , कर्णफुलांची जोड, मंगळसूत्र , मोत्यांचा तुरा , रूळ जोड , पैंजण , सोन्याचे बाजूबंद , तारा मंडळ , आणि जडावाचे हार असे दागिने परिधान करण्यात आले.
अतिशय मौल्यवान हिरेजडीत दागिन्याने मातेला परिधान केल्याने हे रुप अतिशय लोभस दिसत आहे .
भाळी वैशिष्ट्यपूर्ण मळवट आणि त्यावर दागिन्याचा साज यामुळे विठ्ठल मंदिरात दुर्गादेवी अवतरल्याचा आभास होत होता.
शारदीय नवरात्रीनिमित्त रुक्मिणी मातेला दुर्गा देवीच्या पोशाखात सजविण्यात आले
विठुरायालाही अतिशय दुर्मीळ अश्या ठेवणीतील दागिन्याने सजविण्यात आले
नवरात्रीनिमित्त विठ्ठल रुक्मिणीची लोभस रूपे पाहण्यासाठी मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.