Pune Ncp Protest : पुण्यात राष्ट्रवादीचं 'चुलीवरचं आंदोलन'; चुलीवर बनवला दिवाळीचा फराळ
केंद्र सरकारकडून नागरिकांना मर्यादित गॅसचा पुरवठा होणार निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया वेळी महिलांनी चक्क दिवाळीचा फराळ रस्त्यावर मांडलेल्या चुलीवर केला.
केंद्र सरकारकडून नागरिकांना मर्यादित गॅसचा पुरवठा होणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुण्यात विरोध दर्शवण्यात आला.
केंद्राच्या या निर्णयाच्या निषेधार्त राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुण्यात अनोखं आंदोलन करण्यात आले आहे.
या आंदोलनावेळी महिलांनी विरोध म्हणून दिवाळी फराळाचे पदार्थ चुलीवर बनवले आहेत.
केंद्र सरकारने वर्षाला फक्त 15 सिलेंडर मिळतील आणि त्यापुढील प्रत्येक सिलेंडर जास्त किंमतीने घ्यावा लागेल असा निर्णय घेण्यात आला आहे.
चुलीवर करंजी, चकली या सारखे पदार्थ यावेळी बनवण्यात आले होते.1053 रुपये देऊन 15 सिलेंडर का? असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला आहे.