एक्स्प्लोर
Happy Birthday Rubina Dilaik : ‘बिग बॉस’ फेम रुबिनाला अभिनय नाही तर ‘या’ क्षेत्रात करायचे होते काम!
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलैक आज (26 ऑगस्ट) तिचा वाढदिवस साजरा करत आहे.

Rubina Dilaik
1/7

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलैक आज (26 ऑगस्ट) तिचा वाढदिवस साजरा करत आहे. रुबिनाने 2006 मध्ये ‘मिस शिमला’ स्पर्धेत भाग घेतला आणि ही स्पर्धा जिंकली होती.
2/7

रुबिनाला सुरुवातीपासूनच अभिनयाची आवड होती, त्यामुळे तिने 'छोटी बहू' या टीव्ही मालिकेद्वारे मनोरंजन विश्वात पाऊल ठेवले.
3/7

रुबिना दिलैकने 2008 मध्ये टीव्ही सीरियल ‘छोटी बहू’मधून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. मात्र, तिला कधीच अभिनय क्षेत्रात काम करायचं नव्हतं.
4/7

रुबिनाला आयएएस व्हायचं होतं आणि त्यासाठी ती तयारी करत होती. पण, याच दरम्यान ऑडिशनमध्ये तिची निवड झाली. या टेलिव्हिजन सीरियलमध्ये ती राधिकाच्या भूमिकेत दिसली होती.
5/7

'छोटी बहू' मधील तिच्या उत्कृष्ट अभिनयामुळे रुबिना घराघरात प्रसिद्ध झाली. 2012 मध्ये, तिने सोनी टेलिव्हिजनच्या सास बिना ससुरालमध्ये ही मुख्य भूमिका साकारली होती.
6/7

रुबिनाने कलर्स टीव्हीवरील ‘शक्ती-अस्तित्व के एहसास की’मध्ये ‘सौम्या सिंह’ या ट्रान्सजेंडर महिलेची भूमिका केली होती. यासाठी तिचे खूप कौतुक झाले.
7/7

यानंतर रुबिनाने पती अभिनव शुक्लासोबत ‘बिग बॉस’च्या 14व्या सीझनमध्ये भाग घेतला होता. या सीझनची ती विजेती ठरली. रुबिना तिच्या स्टाईल आणि फॅशनमुळे सोशल मीडियावरही चर्चेत असते. (Photo : Rubina Dilaik/IG)
Published at : 26 Aug 2022 10:23 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
कोल्हापूर
विश्व
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
