Bigg Boss Marathi : बिग बॉसच्या घरात बहरलं प्रेम, निक्कीने छोटा पुढारीला केलं किस; नव्या केमेस्ट्रीची जोरदार चर्चा
घन:श्याम दरवडेची 'बिग बॉस मराठी'च्या घरात एन्ट्री झाली आणि पहिल्या दिवसापासून त्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबिग बॉस मराठीच्या घरात छोटा पुढारी घन:श्याम दरवडेसोबत घरातील सदस्य कसेही वागत असले तरी तो त्यांच्याशी प्रेमानेच वागताना दिसत आहे.
घन:श्याम दरवडेच्या प्रत्येक स्टेटमेंटचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असतो.
आपली मतं रोखठोक मांडणारा, मोठमोठ्या नेत्यांना चॅलेंज देणाऱ्या या पुढाऱ्याने घरातील सर्व सदस्यांनाही आपलंस केलं आहे.
'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये घन:श्याम इरिनाला म्हणतोय,तू माझ्याशी कसंही वाग...पण मी तुझ्यासोबत प्रेमानेच वागणार.
या प्रोमोमध्ये निक्की आणि छोटा पुढारीची दोस्ती बहरताना दिसत आहे. तर, जान्हवीसोबतही त्याची चांगली मैत्री झाली आहे.
निक्की तांबोळी घन:श्यामला घट्ट मिठी मारताना दिसत आहे.
त्याशिवाय निक्की घन:श्यामच्या गालावर पप्पीही देते, हा प्रोमो पाहून चाहते अवाक झाले आहेत.
'बिग बॉस मराठी'च्या घरात आज टीव्ही टास्क पार पडणार आहे.
बिग बॉसच्या कल्ला टीव्ही चॅनलवर घरातील सदस्य धमाकेदार परफॉर्मन्स सादर करताना दिसणार आहेत.
घन:श्याम हे सर्व परफॉर्मन्सचं परिक्षण करताना दिसणार आहे. त्यामुळे आजचा भाग खूपच रंजक असणार आहे.