Bigg Boss Marathi Contestant : मेघा घाडगे ते 'शेवंता' फेम अपूर्वा नेमळेकर; 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची नावं जाणून घ्या...
'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वाची पहिली स्पर्धक तेजस्विनी लोणारी ठरली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकधी अभिनेता तर कधी खलनायक अशा भूमिका साकारणारा प्रसाद जवादे आता 'बिग बॉस'मध्ये कोणत्या अंदाजात दिसणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मिसेस मुख्यमंत्री फेम कोल्हापूरची अमृता धोंगडे बिग बॉस मराठीचं चौथं पर्व गाजवायला सज्ज आहे.
'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेच्या माध्यमातून नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेला निखिल राजेशिर्के आता 'बिग बॉस मराठी 4'मध्ये सहभागी झाला आहे.
'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात 'सातारी बाणा' दिसणार आहे. सोशल मीडियावर चर्चेत असणारे किरण माने आता बिग बॉस मराठीमध्ये धमाका करणार आहेत.
छोटा पॅकेट, बडा धमाका असलेला डान्स कोरिओग्राफर विकास सावंत आता बिग बॉस मराठीमध्ये सहभागी होणार आहे.
पुण्याची टॉकरवडी अमृता देशमुख अर्थात गोड आवाजाने महाराष्ट्राला सकाळी उठवणारी स्वीटी बिग बॉसच्या चौथ्या पर्वात सहभागी होणार आहे.
'स्प्लिट्सविला' फेम अभिनेत्री समृद्धी जाधवने ग्रॅंड प्रीमियरमध्ये चांगलाच जलवा दाखवला आहे.
'दोन कटिंग'मध्ये झळकलेला अक्षय केळकर आता 'बिग बॉस 4'मध्ये दिसणार आहे. अक्षय हा स्वभावाने तापट असल्याने बिग बॉसमध्ये काय धमाल करणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
रोडीज फेम योगेश जाधव बिग बॉसच्या चौथ्या पर्वात दिसणार आहे.
'शेवंता' फेम अपूर्वा नेमळेकर 'बिग बॉस' मराठीच्या चौथ्या पर्वात सहभागी झाली आहे.
रिक्षा चालवून भारताची सफर करणारी टुक टुक राणी म्हणजेच यशश्री मसुरकर आता 'बिग बॉस' मध्ये धुमाकूळ घालणार आहे.
त्रिशूल मराठे हा बिग बॉसच्या चौथ्या पर्वात सहभागी होणार आहे. त्रिशूल मराठे हा सर्वसामान्यातून निवडून गेलेल्या स्पर्धकातील एक आहे.
'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात 'माझ्या नवऱ्याची बायको'मधील माया फेम अभिनेत्री रुचिरा जाधव ही सहभागी होणार आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात डॉ. रोहित शिंदे सहभागी होणार आहे. रोहित हा रुचिरा जाधवचा बॉयफ्रेंड आहे.
लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान आहे. लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकरांनी बिग बॉस गाजवल्यानंतर आता प्रसिद्ध लोककलावंत, लावणीक्वीन मेघा घाडगे बिग बॉस मराठीचं चौथं पर्व गाजवायला सज्ज आहे.