Arvind Trivedi Death : पडद्यावर रावण साकारणारे अरविंद त्रिवेदी, खऱ्या आयुष्यात होते रामभक्त; दररोज मागायचे माफी
1987 मध्ये दूरदर्शनवर प्रसारित होणारी लोकप्रिय मालिका 'रामायण'मधील रावणाची भूमिका साकारणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचं मंगळवारी रात्री निधन झालं. वयाच्या 82व्या वर्षी त्यांनी आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचा मृत्यू झाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरामानंद सागर कृत 'रामायण' या लोकप्रिय मालिकेपासूनच अरविंद त्रिवेदी यांच्या कारकिर्दीला कलाटणी मिळाली. त्यांनी साकारलेली रावणाची भूमिका लोकांच्या मनात इतकी ठसली होती की, त्यांना खऱ्या आयुष्यातही त्यांच्या भूमिकेवरुन ओळखू लागले होते.
1991 ते 1996 पर्यंत ते लोकसभेत खासदार होते. दरम्यान, अरविंद त्रिवेदी यांच्या बंधू उपेंद्र त्रिवेदीही गुजराती रंगमंच आणि चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते होते.
खऱ्या आयुष्यात मात्र अरविंद त्रिवेदी रामभक्त होते. ते दररोज प्रभूरामचंद्राची माफी मागत असत. एक हिंदी वृत्तपत्राला अरविंद त्रिवेदी यांच्या नातीनं एक मुलाखत दिली होती. त्यावेळी त्यांनी सांगितलेलं की, अरविंद त्रिवेदी खूप मोठे रामभक्त होते. रावणाच्या भूमिकेसाठी तयार होण्यापूर्वी ते प्रभू रामाची प्रार्थना करत असतं.
रामायण मालिकेनंतर अरविंद त्रिवेदी यांनी 'विक्रम और बेताल' या हिंदी मालिकेतही काम केलं होतं. याशिवाय त्यांनी टेलिव्हिजन विश्वातील अनेक चित्रपटांमधूनही आपल्या अभिनयानं ठसा उमटवला. मात्र आजही त्यांना रामायण मालिकेत त्यांनी साकारलेल्या रावणाच्या भूमिकेमुळं ओळखलं जातं. त्यांनी 300 हून अधिक गुजराती आणि हिंदी चित्रपटांमधून काम केलं आणि अनेक गुजराती नाटकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.
रामायणातील भूमिकेच्या यशानंतर त्यांना भाजपकडून लोकसभा निवडणूकीसाठी तिकीटही देण्यात आलं होतं. त्यांनी गुजरातच्या साबरकांठामधून भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवली आणि बहुमतानं विजयी देखील झाले.