Facebook अल्पवयीन मुलींसाठी धोकादायक? Frances Haugen यांनी फेसबुकवर केलेले पाच आरोप काय आहेत?
Feature_Photo_4
1/9
फ्रान्सिस हॉगन या फेसबुकच्या माजी प्रोजेक्ट मॅनेंजर होत्या. त्यांनी फेसबुकच संबंधी हजारो इंटरनल डॉक्युमेन्ट्स उघड केले आहेत. यूजर्सच्या डेटाचा दुरुपयोग होतोय. समाजात तिरस्कार आणि अफवा, चुकीची माहिती पसरवण्यासाठी या डेटाचा वापर केला जातोय असा आरोप फ्रान्सिस हॉगन यांनी केलाय.
2/9
लोकांची दिशाभूल करणे- फ्रान्सिस हॉगन म्हणतात की, द्वेष, तिरस्कार आणि हिंसा पसरवण्यासाठी फेसबुकचा वापर होतोय हे कंपनीला माहिती आहे. पण ही गोष्ट यूजर्सपासून लपवली जाते, त्यांची दिशाभूल केली जातेय. (photo by getty images)
3/9
अल्पवयीन मुलीना धोकादायक- फेसबुकच्या मालकीचे असलेले इन्स्टाग्राम हे अल्पवयीन मुलींसाठी अत्यंत धोकादायक असल्याचं उघड झालं आहे. तरीही फेसबुक यावर काही कृती करत नाही. (photo by getty images)
4/9
गुंतवणूकदारांची दिशाभूल- फेसबुकवर विश्वास ठेऊन ज्या लोकांनी त्यात गुंतवणूक केलीय त्यांची दिशाभूल केली जात आहे असं फ्रान्सिस हॉगन म्हणाल्या. (photo by getty images)
5/9
समाजात द्वेष पसरवला जातोय- फेसबुकला आपल्या प्लॅटफॉर्मचा वापर हा द्वेष आणि तिरस्कार पसरवण्यासाठी केला जातोय याची माहिती आहे. (photo by getty images)
6/9
जगासाठी धोकादायक - फ्रान्सिस हॉगन यांनी म्यानमारचं उदाहरण देऊन सांगितलं की फेसबुकच्या माध्यामातून जगभरात हिंसा पसरवली जातेय. पण यावर फेसबुक काहीही कारवाई करत नाही. (photo by getty images)
7/9
फेसबुकच्या माध्यमातून देशात सुरु असलेल्या या गोष्टी टाळायच्या असतील तर त्यावर लवकरात लवकर नियंत्रण आणावे अशी विनंती फ्रान्सिस हॉगन यांनी अमेरिकन सिनेटसमोर केली आहे.(photo by getty images)
8/9
फेसबुकमुळे आपल्या मुलांवर वाईट परिणाम होतोय, समाजात फूट पडतेय आणि आपली लोकशाही दुबळी होत जातेय असाही फ्रान्सिस हॉगन यांनी आरोप केलाय. (photo by getty images)
9/9
या कंपन्यांच्या मालकांना फेसबुक आणि इंस्टाग्राम कशा प्रकारे सुरक्षित ठेवायचं हे चांगलंच माहिती आहे. पण समाजासाठी काही आवश्यक असणारे बदल ते करत नाहीत. कारण त्यांना केवळ आर्थिक फायदा मिळवायचा आहे. (photo by getty images)
Published at : 06 Oct 2021 11:55 AM (IST)