PHOTO : ‘एवढं भारी कुणी दिसतं का...’, सई ताम्हणकरच्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस!
मराठी मनोरंजन विश्वच नव्हे तर, बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच चर्चेत असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनयाव्यतिरिक्त सई ताम्हणकर तिच्या फॅशनमुळे देखील नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्री आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
नुकतेच सई ताम्हणकरने तिचे नवे फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोमध्ये तिचा लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
सईने नुकतीच फिल्म फेअर पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. ‘मिमी’ चित्रपटातील भूमिकेसाठी तिला पुरस्कार देण्यात आला.
सईने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचा लूक कमाल दिसत आहे. सोबच तिच्या हेअरस्टाईलने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
बोल्ड मेकअपसह सईचा हा लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या फोटोंमध्ये सईने परिधान केलेला बॉडीकॉन ड्रेस खूप सुंदर आहे.
सईच्या या फोटोशूटवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरु आहे. कमेंट करत अनेकांनी तिचे कौतुक केले आहे.
‘आता काय मी वाचत ना भाऊ... एवढं भारी कुणी दिसतं का...’, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. (Photo : @ saietamhankar/IG)