Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PHOTO : ‘ऋतू हिरवा, ऋतू बरवा…’, प्राजक्ता माळीचा मनमोहक अंदाज!
मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajaktta Mali ) सध्या तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे अधिक चर्चेत असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनुकतेच प्राजक्ता माळीने स्वतःचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो पाहून चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत.
या फोटोंमधील प्राजक्ता मळीचा अंदाज पाहता सगळेच तिच्या या लुकवर फिदा झाले आहेत. मात्र, हे फोटो पोस्ट करताना तिने एक अशी चूक केली, जी नेटकऱ्यांच्या लगेच लक्षात आली. यामुळेच आता ती पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना तिने ‘ऋतू बरवा’ या गाण्यातील ‘थरथरत्या अधरावर, प्रणयी संकेत नवा..ऋतू हिरवा, ऋतू बरवा…’ या ओळींचे कॅप्शन दिले आहे.
प्राजक्ताने कवियत्रीचे नाव लिहिताना ‘शांताबाई शेळके’ऐवजी चुकून ‘शांती शेळके’ असे लिहिले. त्यामुळे आता नेटकरी तिला जोरदार ट्रोल करू लागले आहेत.
मात्र, फोटोंमधील प्राजक्ताचा मनमोहक अंदाज पाहून, चाहते देखील तिच्या रुपाला भुलले आहेत. सोशल मीडियावर कमेंट्स करून ते तिला तिच्या या लूकवर प्रतिक्रिया देत आहेत. (PHOTO : @prajakta_official)