In Pics : दिल्लीचा राजस्थानवर 8 गडी राखून विजय, सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर

David Warner

1/10
दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा (DC vs RR) 8 गडी राखून पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थानने 161 धावांचे आव्हान दिल्लीला दिले.  हे आव्हान दिल्लीचे फलंदाज मिचेल मार्श आणि डेव्हिड वॉर्नर या दोघांनी दमदार अर्धशतकं झळकावत पार केलं आहे. दिल्लीने 18.1 षटकात दोन गडी गमावत हे आव्हान पार केलं.
2/10
पहिली फलंदाजी करणाऱ्या राजस्थान संघाला यंदाच्या हंगामात तीन शतकं लगावणाऱ्या जोस बटलरकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. पण बटलर 7 धावा करुन स्वस्तात माघारी परतला. 
3/10
पण त्यानंतर वन डाऊन थेट आश्विन मैदानात अवचरला आणि त्याने संघाटा डाव एकहाती सावरला.  
4/10
दुसऱ्या बाजूने यशस्वी, संजू हे महत्त्वाचे फलंदाज बाद होत होते. पण आश्विनने टिकून राहत 38 चेंडूत 50 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यानंतर देवदत्त पडिक्कलने 30 चेंडूत 48 धावांची तुफान खेळी करत संघाचा डाव 160 पर्यंत नेला.
5/10
20 षटकानंतर सहा गडी गमावत राजस्थानने 160 धावा केल्या ज्यामुळे दिल्लीसमोर विजयासाठी 161 धावांचे आव्हान होते. 
6/10
राजस्थान संघाने दिलेल्या 161 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या दिल्लीच्या संघाने शून्य धावांवर पहिली विकेट गमावली. बोल्टने घेतलेल्या भरतच्या विकेटने राजस्थानच्या आशा पल्लवीत झाल्या.
7/10
पण त्यानंतर मात्र मिचेल मार्श आणि डेव्हिड वॉर्नर जोडीने टिकून राहून दमदार फलंदाजी केली. दोघांनी तुफान फटकेबाजी करत संघाचा विजय पक्का केला.
8/10
मार्श 89 धावा करुन 18 व्या षटकात चहलच्या गोलंदाजीवर बाद झाला. पण नंतर पंतने लागोपाठ दोन सिक्स खेचले तर वॉर्नरने स्वत:चं अर्धशतक पूर्ण करत संघाला 8 विकेट्सनी विजय मिळवून दिला. 
9/10
दिल्लीच्या या विजयात आधी गोलंदाजाच्या भेदक गोलंदाजीला मार्श वॉर्नर जोडीच्या फलंदाजीची मदत मिळाली.
10/10
या विजयासह दिल्लीला गुणतालिकेतही फायदा झाला आहे.
Sponsored Links by Taboola