स्टाईल आणि मायलेजचा परफेक्ट कॉम्बिनेशन, टाटाची 'ही' कार पाहून पडाल प्रेमात
टाटा मोटर्सने आपली इलेक्ट्रिक कॉम्पॅक्ट SUV Tata Nexon EV चा लॉन्ग रेंज एडिशन Tata Nexon EV Max लॉन्च केला आहे. जुन्या मॉडेलच्या तुलनेत नवीन Nexon मध्ये ARAI प्रमाणित 437 किमी रेंजसह 30 नवीन फीचर्स देण्यात आले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppTata Nexon EV Max मध्ये पॉवरफुल 40.5kWh लिथियम आयन बॅटरी देण्यात आली आहे. या कारमध्ये सध्याच्या Tata Nexon EV पेक्षा 33 टक्के जास्त बॅटरी क्षमता आहे. याची इलेक्ट्रिक मोटर 141 Bhp ची कमाल पॉवर आणि 250 Nm टॉर्क जनरेट करते.
स्पीडबद्दल बोलायचे झाले तर, ही कार फक्त 9 सेकंदात 0-100km ची गती प्राप्त करू शकते. याची टॉप स्पीड 140 किमी प्रति तास इतकी आहे.
कंपनीच्या नवीन Nexon EV मध्ये 7.2kW AC फास्ट चार्जर देण्यात आले आहे. ही कार 6.5 तासांत पूर्णपणे चार्ज होते. तर 50kW DC चार्जरने ही कार फक्त 56 मिनिटांत 0-80 टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते. तसेच टाटा नेक्सन ईव्ही मॅक्स एका चार्जमध्ये ARAI प्रमाणित 437 किमी पर्यंत धावू शकते.
Tata Nexon EV Max ची एक्स-शोरूम किंमत 17.74 लाख ते 19.24 लाख रुपये आहे. केंद्राच्या FAME-2 आणि विविध राज्यांच्या अनुदानामुळे याची किंमत कमी होऊ शकते.
Tata Nexon EV Max ला नवीन इंटीरियर, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट, फोन चार्जर, डिस्प्लेसह ज्वेलेड कंट्रोलर, एअर प्युरिफायर, स्मार्टफोन वॉच इंटिग्रेशन आणि क्रूझ कंट्रोल, अशी अनेक फीचर्स देण्यात आली आहेत.