ZEE MARATHI 2024: मराठी मालिका विश्वाच्या इतिहासातलं सोनेरी पान ‘आभाळमाया’
यंदाचा ‘झी मराठी अवॉर्ड २०२४’ खऱ्या अर्थाने संस्मरणीय असणार आहे, कारण झी मराठी यंदा २५ वर्ष पूर्ण करत आहे. या कार्यक्रमात धमाकेदार परफॉर्मन्स असणार आहेतच सोबत हृदयस्पर्शी आठवणींचा देखील समावेश असणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकार्यक्रम ऐन रंगात असताना घोषणा झाली ती एका अश्या पुरस्काराची ज्याने उपस्थित कलाकारांचे डोळे पाणावले. हा सन्मान कोणा व्यक्तीचा नसून तो होता एका अश्या मालिकेचा, हि तीच मालिका आहे जिच्या कलाकरांच्या आणि तंत्रज्ञांच्या यादीवर नजर टाकली तरी त्या मालिकेची श्रीमंती कळते.
रात्री ८ वाजले रे वाजले कि एखादा एको ऐकू यावा असं या मालीकेचं शीर्षक गीत, सगळया दिशेने कानावर पडायचं.. संध्याकाळी फक्त हिंदी मालिका लागायच्या अशा काळात ज्यांनी मराठीचा झेंडा रोवला आणि सगळ्याना आपली दखल घ्यायला भाग पाडलं, जीच्यावर लोकानी शब्दशः आभाळासारखी माया केली.
या मालिकेच्या उल्लेखाशिवाय ह्या रौप्य महोत्सवी वर्षाचा सोहळा पूर्ण होवूच शकत नाही.. ती मराठी खाजगी वाहिनीवरील पहिली मालिका म्हणजेच आपल्या सगळ्यांची आवडती “आभाळमाया”.. मराठी मालिका विश्वाच्या इतिहासातलं सोनेरी पान.. झी मराठी प्रमाणेच “आभाळमाया” मालिकेलाही झाली आहेत पंचवीस वर्ष पूर्ण..
यावेळी मालिकेची संपूर्ण टीम म्हणजेच सुकन्या कुलकर्णी – मोने , मनोज जोशी, सुबोध भावे, मुक्ता बर्वे, हर्षदा खानविलकर, मनवा नाईक, संजय मोने, उदय सबनीस, अरुण नलावडे, उमेश कामत, सोनाली खरे, राहुल मेहेंदळे, वैजयंती आपटे, मुक्ता बर्वे, प्रिया बापट, लेखक विवेक आपटे, दिग्दर्शक मंदार देवस्थळी, निर्माते अच्युत वाझे आणि सुबोध गाडगीळ मंचावर उपस्थित होते .
हा पुरस्कार घेताना सुकन्या ताईंनी विनय आपटे सर आणि शुभांगी जोशी ह्यांच्याशी असलेल्या नाते संबंधांना उजाळा दिला. मालिकेच शूटिंग म्हटलं की किस्से नाहीत असं होतच नाही.. संजय मोने यांनी किस्से सांगायला सुरुवात केल्यावर संपूर्ण सभागृहात एकच हश्या पिकला.
यासोबतच सुबोध भावे, विवेक आपटे, मंदार देवस्थळी, मुक्ता बर्वे, यांनी देखील जुन्या आठवणींना उजाळा दिला. “आभाळमाया” ही मालिका म्हणजे मैलाचा दगड आहे. . मालिका विश्वातलं बायबल म्हटलं तरीही हरकत नाही.. ज्याने आपण सगळेच प्रेरित झालो.. अशी सगळ्याची भावना होती. सोहळ्याचे निवेदक संकर्षण आणि मृण्मयी यांनी सर्व कलाकारांसोबत सेल्फी घेत, या जुन्या आठवणींना कॅमेरात बंदिस्त केले. तेव्हा अनुभवायला विसरू नका एक अविस्मरणीय सोहळा २६ आणि २७ ऑक्टोबरला संध्या. ७ वा. फक्त आपल्या झी मराठीवर. २५ वर्षांच्या सोहळ्याला सेलिब्रेशन मोठ्ठ होणार.