Kartikeya Wedding: अभिनेता कार्तिकेयने केले ग्रँड साऊथ इंडियन लग्न, आशीर्वाद देण्यासाठी पोहोचले चिरंजीवी
टॉलिवूड अभिनेता कार्तिकेय गुम्माकोंडा याने गर्लफ्रेंड लोहितासोबत लग्न केले. या लग्नाचे काही फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, जे तुम्ही पुढील स्लाइड्समध्ये पाहू शकता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलग्नाच्या या सीझनमध्ये सर्व स्टार्स लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. दरम्यान, अभिनेता कार्तिकेयनेही त्याच्या चाहत्यांना खुशखबर दिली आहे.
कार्तिकेयने दक्षिण भारतीय रितीरिवाजानुसार लग्न केले. दोघांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत आणि त्यांचे चाहते त्यांचे अभिनंदन करत आहेत.
नवजात जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी सुपरस्टार चिरंजीवीही लग्नात पोहोचले.
'RX 100' चित्रपटातून आपली छाप पाडणारा अभिनेता कार्तिकेय गुम्माकोंडा याने त्याची जुनी मैत्रीण लोहिता हिच्याशी लग्न केले आहे.
नोव्हेंबरच्या सुरुवातीला कार्तिकेयने त्याच्या लग्नाची तारीखही उघड केली होती.