Seerat Kapoor : फिटनेसच्या बाबतीत बॉलिवूडलाही टक्कर देतेय ‘ही’ टॉलिवूड अभिनेत्री! पाहा फोटो...
साऊथ इंडस्ट्रीमध्ये देखील अनेक फिट आणि सुंदर अभिनेत्री आहेत. तमन्ना भाटिया, काजल अग्रवाल, समंथासारख्या अभिनेत्री चांगल्याच फिट आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमात्र, तुम्हाला आश्चर्य वाटेल सध्या या अभिनेत्रींना देखील, एका नव्या अभिनेत्रीने फिटनेसच्या बाबतीत मागे टाकले आहे.
अभिनेत्री सिरत कपूरने (Seerat Kapoor) सध्या सगळ्यांनाच चांगलाच फिटनेस गोल दिला आहे.
बॉलिवूडमधील ‘जिद’ या चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर मात्र तिने आपला मोर्चा साऊथच्या सिनेमांकडे वळवला.
‘टायगर’, ‘ओक्का क्षणाम’, ‘राजू गरी गढी’सारख्या सिनेमामध्ये तिने काम केले आहे.
सिरत सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. आपल्या अकाऊंटवरून ती अनेक व्हिडीओ शेअर करत असते.
तिचे अनेक व्हिडीओ फिटनेसच्या, म्हणजेच व्यायामाच्या बाबतीत असतात. आपले जिममधले अनेक फोटोजसुद्धा ती आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. म्हणून, सध्या साऊथची फिटनेस क्वीन म्हणून अभिनेत्री सिरतचे नाव घेतले जाते. (All PC : @iamseeratkapoor/IG)