Vikrant Massey Wedding Pics : ‘मिर्झापूर’चा ‘बबलू भैया’ अडकला लग्नबंधनात! पाहा फोटो...
Vikrant Massey Wedding Pics
1/8
‘मिर्झापूर’ फेम अभिनेता विक्रांत मेस्सीने गर्लफ्रेंड शीतल ठाकूरसोबत सात फेरे घेतले आहेत. अभिनेत्याच्या लग्नाचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
2/8
या फोटोत विक्रांत मेस्सी आणि शीतल ठाकूर लग्नाच्या मंडपात बसलेले दिसत आहेत. अभिनेत्याने त्याच्या खास दिवशी पांढरी शेरवानी परिधान केली होती.
3/8
विक्रांत मेस्सी आणि शीतल ठाकूर आता लग्नबंधनात अडकले आहेत. अभिनेत्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, चाहते त्याच्यावर अभिनंदनाच वर्षाव करत आहेत.
4/8
या फोटोमध्ये अभिनेता विक्रांत मेस्सी त्याच्या कुटुंबासोबत फोटो पोज देताना दिसत आहे. अभिनेत्याने जॅकेटसह पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. या फोटोत ‘दुल्हे राजा’ खूपच सुंदर दिसत आहे.
5/8
विक्रांत मेस्सीची ‘दुल्हनिया’ शीतल ठाकूर हिने खास दिवशी लाल रंगाचा सूट परिधान केला होता.
6/8
विक्रांत मेस्सी आणि शीतल ठाकूर यांनी ‘व्हॅलेंटाइन डे’ला म्हणजेच 14 फेब्रुवारीला कोर्ट मॅरेज केले होते.
7/8
कोर्ट मॅरेजनंतर या जोडप्याने 18 फेब्रुवारीला रितीरिवाजानुसार फेरे घेतले.
8/8
अभिनेता विक्रांत मेस्सी आणि शीतल ठाकूर गेल्या 4-5 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.
Published at : 19 Feb 2022 12:55 PM (IST)