एक्स्प्लोर
In Pics | मिताली- सिद्धार्थचं 'शुभमंगल'
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at :
1/6

सोशल मीडियावर या दोघांनीही आपण विवाहबंधनात अडकल्याचं सांगत ज्यावेळी छायाचित्र पोस्ट केली, तेव्हा चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली. (छाया सौजन्य इन्स्टाग्राम- मिताली मयेकर/ @gaatha.co.in)
2/6

विवाहसोहळ्यासाठी सिद्धार्थने जांभळ्या आणि सोनेरी अशा रंगांची रंगसंगती असणारी वेशभूषा केली होती. (छाया सौजन्य इन्स्टाग्राम- मिताली मयेकर/ @gaatha.co.in)
3/6

सुरेख अशा वाड्यामध्ये ही सेलिब्रिटी जोडी विवाहबंधनात अडकली. इथं दोघांचेही कुटुंबीय आणि काही खास मित्रांची उपस्थिती होती. यामध्ये काही सेलिब्रिटींची हजेरी पाहायला मिळाली. (छाया सौजन्य इन्स्टाग्राम- मिताली मयेकर/ @gaatha.co.in)
4/6

तर, मितालीनं हिरव्या रंगाची साडी नेसत पेशवाई लूकनं या दिवसाची शोभा आणखी वाढवली. वा़ड्यात लग्नसोहळ्याचं आयोजन करण्यात आल्यामुळं मिताली आणि सिद्धार्थ या दोघांनीही एकमेकांना आणि अर्थातच या वा़तावरणाला साजेशी वेशभूषा करण्याला प्राधान्य दिलं होतं. (छाया सौजन्य इन्स्टाग्राम- मिताली मयेकर/ @gaatha.co.in)
5/6

लोणावळ्यापाशी असणाऱ्या ढेपे वाडा येथे मिताली आणि सिद्धार्थचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. हळद, मेहेंदी अशा सर्व समारंभाची छायाचित्र चाहत्यांच्या भेटीला आणल्यानंतर आता या जोडीनं त्यांच्या लग्नातील काही खास क्षणही सर्वांसमोर आणले आहेत. (छाया सौजन्य इन्स्टाग्राम- मिताली मयेकर/ @gaatha.co.in)
6/6

अभिनेत्री मिताली मयेकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांची मैत्री आणि तिथपासून सुरु झालेलं प्रेमाचं नातं आता एका वेगळ्या वळणावर आलं आहे. या वळणावरुन यापुढं या दोघांचाही सहजीवनाचा प्रवास सुरु होत आहे. (छाया सौजन्य इन्स्टाग्राम- मिताली मयेकर/ @gaatha.co.in)
Published at :
Sponsored Links by Taboola
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
'देऊळ' सिनेमासाठी गिरीश कुलकर्णींना नाना पाटेकरच का हवे होते? सांगितला किस्सा; म्हणाले, 'नानांनी मला 6 महिने तंगवलं'
करमणूक
'अशोक मामा अन् लक्ष्मीकांत बेर्डे खूप सतवायचे, फायटिंग सीन करताना चिमटा...'; उदय टिकेकरांनी सांगितला सेटवरचा किस्सा
करमणूक
एकापेक्षा जास्त पुरुषांसोबत नातं असेल, तर त्यात अडचण काय? अभिनेत्रीचं ओपन रिलेशनशिप्सवर बेधडक वक्तव्य, म्हणाली...
करमणूक
अभिनय सोडला, टक्कल केलं अन् भुवया काढल्या; गोविंदाच्या आईनं असं का केलं? पती म्हणाला, 'तू खूप सुंदर आहेस पण...'






















