PHOTO: पलक तिवारीला 'कुपोषित', अशी कमेंट करणाऱ्यांना श्वेतानं दिलं सडेतोड उत्तर..
Shweta Tiwari , Palak Tiwari : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari ) तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. (photo:palaktiwarii/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'कसौटी जिंदगी की' या मालिकेमुळे श्वेताला विशेष लोकप्रियता मिळाली. श्वेताची मुलगी पलक तिवारीनं (Palak Tiwari) देखील अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. (photo:palaktiwarii/ig)
लक सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. वेगवगेळ्या लूकमधील फोटो ती शेअर करते. तिच्या फोटोवर तिचे चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात. पण काही लोक तिला ट्रोल देखील करतात. या ट्रोलर्सला श्वेतानं सडेतोड उत्तर दिलं आहे. (photo:palaktiwarii/ig)
सोशल मीडियावर काही लोक पलकला कुपोषित अशी कमेंट करू ट्रोल करतात.(photo:palaktiwarii/ig)
या ट्रोलर्सला सडोतेड उत्तर देत श्वेता म्हणाली, 'लोक पलकला सुकडी, कोपषित असं म्हणत ट्रोल करतात. पण मी तिला याबाबत काहीच बोलत नाही कारण मला वाटत तुम्ही जसे आहात तसेच सुंदर आहात. तुम्ही हेल्दी आयुष्य जगत असाल तर या गोष्टींकडे तुम्ही लक्ष देऊ नका. तिची बॉडी कशी आहे? या गोष्टीचा मी जास्त विचार करत नाही कारण ती हेल्दी आहे. ' श्वेतानं पुढे सांगितलं की लोकांनी केलेल्या या कमेंट्सकडे ती लक्ष देत नाही. (photo:palaktiwarii/ig)
हार्डी संधूच्या बिजली बिजली या गाण्यामधून पलकनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. ती लवकरच विशाल मिश्रा यांच्या रोजी: द सॅफरन चॅप्टर या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. पलक ही 21 वर्षाची आहे. कमी वयात पलकला चांगली लोकप्रियता मिळाली. (photo:palaktiwarii/ig)