पंजाबमध्ये 'आप'ला का मिळाला 'मान'? काँग्रेसचा सुपडा साफ होण्याची कारणं काय?
पंजाबमध्ये (Punjab Election Result 2022 ) आतापर्यंत आम आदमी पार्टीने (AAP)मोठी आघाडी घेतली आहे. पंजाबमध्ये विधानसभेच्या 117 जागा आहेत. यामध्ये आप तब्बल 89 जागांवर आघाडीवर आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. विजयाचं सेलिब्रेशन देखील आपनं सुरु केलं आहे.
भगवंत मान हे आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत.
काँग्रेसच्या हातात असलेले हे राज्य हातातून जाण्याची अनेक कारणं आहेत. यामध्ये महत्वाचं म्हणजे क्रिकेटर आणि मूळचे भाजपवासी नवज्योतसिंह सिद्धू यांना प्रदेश अध्यक्ष बनवले आणि मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्यापुढे आव्हान उभे केले
या दोघांमधून विस्तवही जात नसल्याने अमरिंदर सिंह यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
त्यानंतर काँग्रेसने लगेचच चरणजितसिंह चन्नी यांना मुख्यमंत्रीपदी बसवले.
पंजाबमध्ये सत्ता आल्यास आपला सत्ता मिळालेलं हे दुसरं राज्य असेल. भगवंत मान हे आपचे पंजाबमधील मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषित केले आहेत. पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमध्ये सत्ता येणार असल्याचा दावा अनेकदा केला होता. तसेच पंजाबमध्ये आपनं मोठी ताकत लावली होती.
पंजाबमध्ये काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. काँग्रेस आतापर्यंत केवळ 12 जागांवर आघाडीवर आहे. सोनू सूदची बहिण मालविका देखील पिछाडीवर आहे.
अकाली दल 10 जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे. तर भाजप मात्र निष्प्रभ दिसून येत आहे