PHOTO: ब्रेस्ट साईजपासून बॉडी शेमिंगपर्यंत; जेव्हा 'या' अभिनेत्रींवर कमेंट करताना ट्रोलर्सनी ओलांडलेल्या सर्व मर्यादा

सायंतनी घोष ही एक प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री. तिनं एका मुलाखतीत खुलासा केला होता की, तिच्या ब्रेस्ट साईजमुळे तिला खूप ट्रोल करण्यात आलं होतं आणि ट्रोलर्सनी तिच्यावर अत्यंत वाईट कमेंट केल्या होत्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सायंतीनं सांगितलेलं की, सोशल मीडियावर लोकांनी तिला खूप मूर्ख प्रश्न विचारले होते आणि तो अनुभव खूपच भयानक होता.

शमा सिकंदरनंही बॉडी शेमिंगचा सामना केला आहे. हा पण त्यावेळी शमा ट्रोलर्सना पुरून उरली होती. तिनं सडेतोड उत्तर देत ट्रोलर्सची बोलती बंद केली होती. तिनं लिहिलं होतं की, आतातरी लोकांनी महिलांच्या शरीराला ऑब्जेक्टिफाय करणं बंद केलं पाहिजे.
रितशा राठोडनं 'बढो बहू' या मालिकेतून तिच्या दमदार अभिनयानं लोकांची मनं जिंकली. रिताशाला सोशल मीडियावर बॉडी शेमिंगचाही सामना करावा लागतो. दरम्यान, अभिनेत्री याकडे लक्ष देत नाही आणि शरीराची सकारात्मकता वाढविण्यावर विश्वास ठेवते.
रिताशा सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत राहते आणि प्रत्येक व्यक्तीनं आपले शरीर जसं आहे, तसं स्वीकारले पाहिजे, असा संदेश देखील तिनं दिला आहे.
दिव्या दत्ता देखील बॉडी शेमिंगची बळी ठरली. तिच्या इंस्टाग्रामवरील फोटोंवर लोकांनी खूप वाईट कमेंट केल्या होत्या.
दरम्यान, दिव्यानंही ट्रोलर्सना चोख उत्तर दिले आणि लिहिलं की, आता महिलांकडे वस्तू म्हणून पाहणं थांबवा.