एक्स्प्लोर
IN PICS : रुची सवर्ण आणि अंकित मोहनला 'पुत्ररत्न'; पाहा फोटो

ankit mohan
1/6

Ankit Mohan - Ruchi Savarn : रुची सवर्ण आणि अंकित मोहनवर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नुकतेच त्यांच्या घरी चिमुकल्याचे आगमन झालं आहे. (photo : ruchisavarn/ig )
2/6

छोट्या पडद्यावरील हे कलाकार आज एका बाळाचे पालक झाले आहेत. 'नागिन 3', 'महाभारत' अशा दर्जेदार शोमध्ये काम केलेल्या अंकितने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. (photo : ruchisavarn/ig )
3/6

आपल्या बाळाला शुभेच्छा आणि प्रेम दिल्याबद्दल अंकितने चाहत्यांचे आभार मानले आहेत. अंकितने लिहिले आहे,"आम्हाला प्रेम आणि आशीर्वाद दिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. तुमच्या सर्वांचे प्रेम मिळण्यासाठी कुटुंबात आता आणखी एका सदस्याची भर झाली आहे". (photo : ruchisavarn/ig )
4/6

लग्नाच्या सहा वर्षानंतर अंकित आणि रुचीने त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत केले आहे. (photo : ruchisavarn/ig )
5/6

अंकित आणि रुची 2015 मध्ये लग्नबंधनात अडकले होते. अभिनेता अंकित मोहन आणि त्याची पत्नी अभिनेत्री रुची सवर्ण यांनी आजवर अनेक हिंदी आणि मराठी मालिकांसोबतच सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे. (photo : ruchisavarn/ig )
6/6

'शुभ प्रसंगी शुभ बातमी…. नवीन पाहुणा लवकरच येतोय' अशा आशयाचं कॅप्शन देत अंकितने रुचीसोबतचे फोटो काही दिवसांपूर्वी शेअर केले होते. अंकित लवकरच 'पावनखिंड' सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (photo : ruchisavarn/ig )
Published at : 10 Dec 2021 02:35 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
क्राईम
भारत
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
