निक आणि प्रियांका म्हणजेच चाहत्यांच्या 'निक्यांका'नं शाही विवाहसोहळ्यानंतर एका स्वागत समारंभाचं अर्थात रिसेप्शनचंही आयोजन केलं होतं.
2/10
प्रियांकाला नेण्यासाठी वऱ्हाडी थेट परदेशातून भारतात आले होते.
3/10
संगीत सोहळा, हळद, मेहेंदी आणि मग मुख्य विवाहसोहळा अशा टप्प्यांमध्ये हा दिमाखदार सोहळा पार पडला.
4/10
हिंदू आणि ख्रिस्ती अशा दोन्ही पद्धतींमध्ये प्रियांका आणि निकचा विवाहसोहळा पार पडला होता.
5/10
प्रियांका चोप्रा हिच्या विवाहसोहळ्याची बरीच चर्चा पाहायला मिळाली होती. अर्थात त्यामागं कारणंही तशीच होती...
6/10
अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिनं 2018 मध्ये निक जोनास याच्याशी लग्नगाठ बांधली. प्रियांका आणि निकचा विवाहसोहळा जोधपूरमधील उमेदभवन पॅलेस येथे पार पडला. मुख्य म्हणजे फक्त बॉलिवूडच नव्हे, तर हॉलिवूडमध्येही या शाही विवाहसोहळ्याची चर्चा झाली.
7/10
प्रियांकाच्या लग्नसोहळ्यामध्ये भेटवस्तूंपासून ते अगदी विवाहस्थळापर्यंत सारंकाही खूपच खास होतं.
8/10
डिझायनर कपड्यांपासून ते अगदी सेलिब्रिटी पाहुण्यांच्या उपस्थितीपर्यंत सर्वच बाबतीत प्रियांका आणि निकच्या विवाहसोहळ्यानं सर्वांचं लक्ष वेधलं होतं.
9/10
एखाद्या राणीप्रमाणंच तिनं लेहंग्याला साजेशा दागिन्यांनाही पसंती दिली होती.
10/10
मुख्य विवाहसोहळ्यासाठी प्रियांकानं जो लेहंगा परिधान केला होता, त्यामध्ये फक्त लाल रंगाचाच वापर करण्यात आला होता. ज्यामुळं प्रियांकाचं सौंदर्य आणखीन खुलून आलं होतं.