Richa Chadha Maternity Photoshoot: रिचा चड्ढाने केले सुंदर मॅटर्निटी फोटोशूट, दिसली पती अली फजलच्या मिठीत..
बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक रिचा चढ्ढा आणि अली फजल लवकरच पालक होणार आहेत. दोघेही आपल्या पहिल्या मुलाचे कधीही स्वागत करू शकतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्री कोणत्याही दिवशी बाळाला जन्म देऊ शकते. दरम्यान, अभिनेत्रीने अलीसोबत मॅटर्निटी फोटोशूट केले आहे, जे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
रिचा चड्ढाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या मॅटर्निटी फोटोशूटचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.
फोटोंमध्ये हे कपल खूपच सिझलिंग लूकमध्ये दिसत आहे. ऋचाने ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केले आहेत.
फोटोंमध्ये दोघेही बेबी बंपवर हात ठेवून दिसत आहेत. एका फोटोत ऋचा बेबी बंप हातात धरलेली दिसत आहे.
रिचा चड्ढाच्या पोस्टमध्येही एक खास गोष्ट होती. तिचे फोटो शेअर केल्यानंतर तिने कमेंट सेक्शन बंद केला होता, ज्याचा तिने कॅप्शनमध्ये उल्लेख केला आहे.
तिने लिहिले- कमेंट बॉक्स बंद आहेत, कारण ही मी पोस्ट केलेली सर्वात वैयक्तिक गोष्ट आहे.
रिचा चढ्ढाने कॅप्शनमध्ये काहीतरी खास लिहिले आहे. कॅप्शनमध्ये रिचाने लिहिले- असे पवित्र प्रेम जगाला प्रकाशाच्या किरणांशिवाय दुसरे काय आणू शकते?
दीपिकाला प्रेग्नंसीवरुन ट्रोल करणाऱ्यांना रिचा चढ्ढाने चांगलच सुनावलं.
सध्या रिचाच्या या कमेंटची सोशल मीडियावरही बरीच चर्चा सुरु आहे. (pc:therichachadha/ig)