'कुछ कुछ होता है' चित्रपटात काम करण्यास रवीना टंडनने नकार दिला होता; जाणून घेऊया!

काही बॉलीवूड चित्रपट नेहमीच लोकांच्या हृदयात विशेष स्थान मिळवतात. या चित्रपटांच्या यादीत 'कुछ कुछ होता है'च्या नावाचाही समावेश आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
स्टारकास्टपासून ते कथेपर्यंत चित्रपटाच्या प्रत्येक सीनला लोकांचं प्रेम मिळालं. पण रवीना टंडनने चित्रपटात काम करण्यास स्पष्ट नकार दिला होता.

एएनआयशी बोलताना रवीनाने हा किस्सा सांगितला. या चित्रपटात काम न केल्याबद्दल करणने तिला अद्याप माफ केले नसल्याचे अभिनेत्रीचे म्हणणे आहे.
तिला काजोलसोबत छोटी भूमिका करायची नव्हती, म्हणून तिने चित्रपटात काम केले नाही.
रवीना म्हणते की, तिला ४-५ सीन्स आणि गाण्यांच्या पलीकडे एक ओळख निर्माण करायची होती.
लोकांनी तिच्या अभिनयाबद्दल बोलावे अशी तिची इच्छा होती.
रवीना टंडनच नाही तर इतर अनेक अभिनेत्रींनी राणी मुखर्जीची भूमिका साकारण्यास नकार दिला होता.
'कुछ कुछ होता है' हा चित्रपट 1998 मध्ये प्रदर्शित झाला होता.(photo:officialraveenatandon/ig)