डी-मॅट अकाऊंटवर आकारले जातात 'हे' चार्जेस, नीट समजून घ्या अन्यथा खिसा होईल खाली!
शेअर बाजारात पैसे गुंतवून तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर त्यासाठी डी-मॅट अकाऊंट (D Mat Account) लागते. डी-मॅट खाते नसेल तर तुम्हाला शेअर बाजार किंवा म्यूच्यूअल फंड अशा कशातही गुंतवणूक करता येत नाही
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appडी-मॅट अकाऊंट चालू करण्यासाठीची प्रक्रिया फार सोपी आहे. तुम्ही विचारपूस केल्यास कोणताही ब्रोकर तुम्हाला तुमचे डी-मॅट खाते चालू करून देईल. विशेष म्हणजे घरी बसूनदेखील हे खाते चालू करता येते.
डी-मॅट खाते चालू केल्यानंतर तुमच्याकडून वेगवेगळे चार्जेस घेतला जातात. डी-मॅट खाते चालू करतानाच तुमच्याकडून काही फी घेतली जाते.
डी-मॅट खाते चालू केल्यानंतर शेअर बाजार आणि म्यूच्यूअल फंडात गुंतवणूक करू शकता. मात्र हा व्यवहार करतानाही तुम्हाला काही फी द्यावी लागते. वेगवेगळे ब्रोकर वेगवेगळी फी आकारतात.
डी-मॅट खात्याची सर्व प्रकिया चालू ठेवण्यासाठी ब्रोकरला मेन्टेनन्स चार्ज द्यावा लागतो. याला वार्षिक फी असेदेखील म्हटले जाते. ही वार्षिक फी साधारण 300 ते 800 रुपयांपर्यंत असते.
डी-मॅट खाते असणाऱ्यांना ट्रांन्जेक्शन चार्जेसही द्यावे लागतात. म्हणजेच तुम्ही एखादा स्टॉक खरेदी करता किंवा विक्री करता, तेव्हा तुम्हाला काही चार्जेस द्यावे लागतात. प्रत्येक ब्रोकरचे चार्जेस वेगवेगळे असतात.
छोट्या गुंतवणूकदारांना अनेक चार्जेसपासून सूट मिळते. सेबीच्या नियमानुसार 50 हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी बॅलेन्स असणाऱ्या बेसिक सर्व्हिसेस डी-मॅट अकाऊंटवर वार्षिक मेन्टेनन्स चार्जेस द्यावे लागत नाहीत.