भारतीय वंशाची आहे केशव महाराजची पत्नी; बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देणारं सौंदर्य, पाहा Photo's
भारतीय वंशाचा दक्षिण अफ्रिकेचा केशव महाराज हा कायम चर्चेत असणारा खेळाडू आहे. डावखुरा फिरकी गोलंदाज असलेल्या केशव महाराज याच्या पत्नीचे नाव लेरीशा मुनसामी आहे. (Image Credit-Keshav Maharaj, Insgm)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेशव महाराज आणि त्याची पत्नी लेरिशा हे दोघेही भारतीय वंशाचे आहेत. केशव आणि त्याची पत्नी लेरिशा यांचे भारतात अनेक नातेवाईक आहेत. (Image Credit-Keshav Maharaj, Insgm)
लेरिशा एक प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना आहे. लेरीशा मुनसामीचे फोटो आणि डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच प्रसिद्ध आहेत. (Image Credit-Keshav Maharaj, Insgm)
लेरिशा आणि केशव महाराजची लव्ह स्टोरी केशव आणि लेरिशा यांची ओळख त्यांच्या कॉमन फ्रेंड्समुळे झाली.केशव आणि लेरिशा यांच्यामध्ये सुरुवातीला मैत्री झाली. त्यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. (Image Credit-Keshav Maharaj, Insgm)
रिलेशनशिपमध्ये असूनही केशव आणि लेरिशा यांनी त्यांच्या नात्याबाबत कुटुंबाला सांगितलं नव्हते. नंतर केशव आणि लेरिशा यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. केशव महाराजने 2022 मध्ये लेरिशासोबत लग्नगाठ बांधली. (Image Credit-Keshav Maharaj, Insgm)
लेरिशा ही सोशल मीडियावर अॅक्टिव असते. ती केशवसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते. लेरिशाला इन्स्टाग्रामवर 49.5K फॉलोवर्स आहेत. (Image Credit-Keshav Maharaj, Insgm)
लेरिशा आणि केशव यांच्या फोटोवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात. (Image Credit-Keshav Maharaj, Insgm)
केशव महाराजची कारकीर्द काय?- केशव महाराज याने दक्षिण आफ्रिकेसाठी आतापर्यंत 42 कसोटी, 21 एकदिवसीय आणि 13 टी-20 सामने खेळले आहेत. यादरम्यान केशवने कसोटी सामन्यात ३०.६७ च्या सरासरीने 150 विकेट घेतल्या आहेत. त्याच वेळी, या फिरकीपटूच्या नावावर एकदिवसीय सामन्यात 25 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 10 विकेट आहेत. केशवने कसोटी क्रिकेटमध्ये 953 धावा केल्या आहेत. (Image Credit-Keshav Maharaj, Insgm)