रॅपर धर्मेश परमार (Dharmesh Parmar) उर्फ एमसी तोड फोड (MC Tod Fod)चे निधन झाले आहे.
2/7
नं वयाच्या 24 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून धर्मेशला श्रद्धांजली वाहिली आहे.
3/7
रणवीर सिंहच्या गली बॉय या चित्रपटाचा साउंडट्रॅक धर्मेशनं गायला होता.
4/7
तसेच स्वदेशी नावाच्या सिंगिंग बँडमध्ये धर्मेश सहभागी होता. स्वदेशी बँडने धर्मेशच्या निधनाची माहिती दिली.
5/7
रणवीर सिंह आणि सिद्धांत चतुर्वेदीनं धर्मेशचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच रॅपर रफ्तारनं देखील धर्मेशला श्रद्धांजली वाहिली.
6/7
स्वदेशी बँडनं स्वदेशी मेलामधील धर्मेशच्या परफॉर्मन्सचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
7/7
आठ तारखेला धर्मेशचा ‘ट्रुथ अँड बास' हा अल्बम प्रदर्शित झाला होता. या अल्बमला प्रेक्षकांची पसंती मिळाली. फार कमी वयात धर्मेशनं विशेष लोकप्रियता मिळवली.