एका टेलिव्हिजन शोमुळे नशीब पालटलं, पुढे तोच शो होस्ट करून कोट्यवधी छापले; आज तरुणाईच्या गळ्यातील ताईत, 'या' अभिनेत्याला ओळखता का?
तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेल्या रणविजय सिंहनं एमटीव्हीच्या रोडीज शोमधून आपली ओळख निर्माण केली. आज तो तरुणाईचा आयकॉन बनला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appव्हीजे म्हणून कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या रणविजय सिंहला 'रोडीज' या प्रसिद्ध शोद्वारे देशभरात ओळख मिळाली. रणविजय सिंह यावर्षी त्याचा 41 वा वाढदिवस साजरा करत आहेत. चाहत्यांना नेहमीच त्याच्याबद्दल सर्वकाही जाणून घ्यायचं असतं.
रणविजय सिंहचा जन्म 16 मार्च 1983 रोजी जालंधर येथे एका पंजाबी कुटुंबात झाला. रणविजयचे वडील लष्करी अधिकारी होते आणि त्यांनाही त्यांच्या वडिलांप्रमाणे सैन्यात भरती व्हायचं होतं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणविजयनं आर्मीसाठी लेखी आणि वैद्यकीय चाचणी उत्तीर्ण केली होती. पण सामील होण्यापूर्वी, तो त्याच्या मित्राच्या आग्रहावरून एमटीव्ही रोडीजसाठी ऑडिशनला गेला होता. सैन्यात भरती होण्याची तयारी करत असतानाच, रणविजयनं व्हीजे म्हणूनही काम केलं आणि काही छोटे कार्यक्रम आयोजित केले होते.
रणविजय रोडीजच्या ऑडिशनमध्ये सिलेक्ट झाला, शोमध्ये सहभागी होऊन त्यानं हा शो जिंकला. पुढे रणविजय याच शोचा होस्ट झाला. रणविजय तब्बल 18 वर्षांपासून या शोशी जोडला गेला आहे. कधी होस्ट म्हणून तर कधी जज म्हणून त्यानं सर्वांनी मनं जिंकली आहेत.
रणविजयनं सलमान खानच्या लंडन ड्रीम्स (2009) मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. याशिवाय त्यांनी 'धरती', 'सादी लव्ह स्टोरी', 'तौर मित्रन दी' या पंजाबी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
ईटाइम्सच्या वृत्तानुसार, रोडीज सोडण्याबद्दल रणविजय म्हणाला, 'मी पहिल्या दिवसापासून रोडीजचा भाग आहे. मी रोडीजला 18 वर्ष देणारा माणूस आहे. मी फक्त रोडीजमध्येच नाही तर, इतर शोमध्येही काम केलं आहे. कोविड निर्बंध, तारखा बदलणं, काही वचनबद्धता, दक्षिण आफ्रिकेतील शूटिंग इत्यादींमुळे मला शो सोडावा लागला.'
रणविजयने मुलाखतीत सांगितलं होतं की, भविष्यात संधी मिळाली तर तो त्याबद्दल विचार करेल, पण कधीकधी काही महत्त्वाच्या गोष्टी इतर कारणांमुळे सोडाव्या लागतात. रणविजय सध्या काही पंजाबी प्रोजेक्ट्सवर काम करत आहे.
2014 मध्ये रणविजय सिंहनं प्रियंका वोहरासोबत लग्न केलं. रणविजय आणि प्रियांका यांना दोन मुलं आहेत. रणविजय शेवटचा नेटफ्लिक्सवरील 'मिस मॅच्ड' शोमध्ये दिसला होता.