Drug Case: बॉलिवूड आणि टॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) ची ईडीकडून(Enforcement Directorate) काल जवळपास अडीच तास चौकशी करण्यात आली. (photo courtesy : @rakulpreet/IG)
2/7
ईडीकडून ड्रग्स प्रकरणी चार वर्ष जुन्या का प्रकरणात काही कलाकारांना समन्स जारी केलं होतं. यात रकुलचाही समावेश आहे. (photo courtesy : @rakulpreet/IG)
3/7
साल 2017 मध्ये तेलंगणाच्या अधिकाऱ्यांनी 30 लाखांचं ड्रग्ज जप्त केलं होतं. यात 12 गुन्हे दाखल केले होते. (photo courtesy : @rakulpreet/IG)
4/7
यानंतर ईडीनं मनी लॉन्ड्रिंगच्या अँगलने या प्रकरणाची चौकशी सुरु केली होती. (photo courtesy : @rakulpreet/IG)
5/7
या प्रकरणात रकुल प्रीत, राणा दग्गुबाती, तेजा, पुरी जगन्नाथ, चार्ममे कौर आणि मुमैथ खान सह अन्य कलाकारांना वेगवेगळ्या तारखांना चौकशीसाठी बोलावलं आहे. (photo courtesy : @rakulpreet/IG)
6/7
रकुलला याआधी 6 ऑगस्टला ईडीसमोर येण्याचं सांगितलं होतं. मात्र रकुलनं वेळ बदलून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार तिची चौकशी काल करण्यात आली. (photo courtesy : @rakulpreet/IG)
7/7
या प्रकरणात ईडीने एक्साइज डिपार्टमेंटशी देखील विचारपूस केली आहे जे या प्रकरणाची चौकशी करत आहेत. (photo courtesy : @rakulpreet/IG)