कधी प्रेम तर कधी भांडण, रक्षाबंधनानिमित्त कलाकारांना आली भाऊ-बहिणीच्या नात्याची आठवण!
'पारू' मालिकेतील शरयू सोनावणे म्हणते, माझ्या भावाचं नाव आहे सिद्धांत सोनवणे आणि आम्ही जुळी भावंडं आहोत. आमच्यात ८ मिनिटांचा फरक आहे आणि त्यात तो मोठा आहे. मला घरात सर्व शेंड फळ म्हणतात. आमचं नातं असं आहे की मी आजारी पडली की तो ही आजारी पडायचा, मला दुखापत झाली की त्यालाही त्रास व्हायचा आम्ही एकत्र ही राहात नव्हतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'लाखात एक आमचा दादा' मधला नितीश चव्हाण म्हणाला, माझ्या दादाच नाव निलेश चव्हाण आहे. तो माझ्यापेक्षा ७ वर्षांनी मोठा आहे. आम्ही फक्त भाऊ नाही तर छान मित्र ही आहोत. कुठे ही बाहेर जायचे असेल, काही नवीन गोष्टीची खरेदी करायची असेल तर आम्ही दोघे एकमेकांना विचारूनच करतो. मला आयुष्यात काही निर्णय घ्यायचे असतील तर मी त्याचा सल्ला घेतो. आईबाबानंतर तोच माझ्यासाठी आई-वडील आहे असं म्हणायला हरकत नाही इतकं घट्ट आमचं नातं आहे.
'नवरी मिळे हिटलरला' मधली वल्लरी विराज ने सांगितले , मला लहान भाऊ आहे जो माझ्याहून ३ वर्ष लहान आहे. तो Law च्या शेवटच्या वर्षाला आहे.आमच्या नात्याबद्दल बोलायचे झाले तर लहान असताना आम्ही खूप भांडायचो, मस्ती करायचो पण जसं आम्ही मोठे होत गेलो आमची घट्ट मैत्री झाली आणि प्रत्येक गोष्ट आम्ही एकमेकाला सांगायला लागलो, माझ्या आयुष्यात एखादी गोष्ट माझ्या आई-बाबांना माहिती नसेल पण भावाला सगळं माहिती असत. माझ्याहून लहान असला तरीही माझा भाऊ प्रॅक्टिकल विचार करणारा आहे,
'लाखात एक आमचा दादा' मालिकेतल्या कोमल मोरे म्हणते, माझा लहान भाऊ आहे ज्याचे नाव आहे अभिजीत तो माझ्यापेक्षा जवळपास ६ वर्षांनी लहान आहे. आमच्या नात्यात खूप सार प्रेम आणि थोडंस भांडण, रुसवे फुगवे आहेत, जसं जगात प्रत्येक भाऊ बहिणीचं नातं असत. पण माझा लहानभाऊ माझ्यासाठी खूप स्पेशल आहे जितकं जगात कोणावर नसेल तितकं माझं माझ्या भावावर प्रेम आहे.
'तुला शिकवीन चांगलाच धडा' मधल्या हृषिकेश शेलार ने सांगितले, माझ्या बहिणी माझ्याहून १४- १५ वर्ष मोठ्या आहेत पण आमचं नातं खूप गोड आहे आणि या नात्याचं वैशिष्ट आहे की मला सख्याबहिणी नाहीत माझ्या दोन मावस बहिणी आहे आणि त्या सख्या बहिणींपेक्षा जवळच्या आहेत. त्यांनी मला खूप लाडानी आणि प्रेमानी वाढवलं आहे.