Rishabh Pant : रिषभ पंतनं घेतला मोठा निर्णय, एका निर्णयानं दिल्लीकरांची मनं जिंकली, दिल्ली प्रीमियर लीगमध्ये खेळणार
दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशननं दिल्ली प्रीमियर लीग टी20 स्पर्धेची सुरुवात केली आहे. याचा पहिला हंगाम 17 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. यात भारताच्या संघातील आणि आयपीएल खेळणारे खेळाडू सहभाग घेणार आहेत. या स्पर्धेच्या पहिल्या मॅचमध्ये रिषभ पंत खेळणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरिषभ पंतनं डीपीएल टी 20मध्ये खेळण्यास होकार दिला आहे. रिषभ पंत दिल्ली 6 या संघाकडून खेळणार आहे. तो साऊध दिल्ली सुपरस्टार्स संघाविरोधात खेळणार आहे.
रिषभ पंतसोबत इशांत शर्मा देखील खेळणार आहे. रिषभ पंत केवळ एक मॅच या स्पर्धेत खेळणार असून नंतर तो भारतीय संघाच्या आगामी कसोटी आणि टी 20 मालिकेच्या तयारीला वेळ देणार आहे.
टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या माहितीनुसार रिषभ पंतनं डीपीएलटी 20 मध्ये पहिली मॅच खेळण्यास सहमती दर्शवली आहे. रिषभ पंतच्या जडणघडणीत दिल्ली क्रिकेटची भूमिका महत्त्वाची राहिलेली आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यात कसोटी आणि टी 20 मालिका पुढील महिन्यात होणार आहे. रिषभ पंत सध्या भारताचा महत्त्वाचा खेळाडू असून विकेटकीपर म्हणून महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहे.