अखेर जब्याला काळी चिमणी गावली! अभिनेत्री राजश्री खरातनं गुपचूप उरकलं लग्न? सोशल मीडियावर पोस्ट केला खास फोटो

या फोटोला तिने काहीही कॅप्शन दिलेलं नाही. मात्र, राजेश्वरी आणि सोमनाथ यांचा लग्नमंडपातील फोटो पाहिल्यानंतर चर्चांना उधाण आलं आहे. हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नागराज मंजुळे दिग्दर्शित 2013 साली आलेल्या फँड्री चित्रपटाचे चाहते आणि समिक्षकांचं भरपूर प्रेम मिळालं.

फँड्री चित्रपटाची सर्वत्र खूप चर्चा झाली. चित्रपटाची कथा, दिग्दर्शिन, कलाकाराचं अभिनय सर्वांना फार आवडला. चित्रपटातील गाणीही विशेष गाजली.
या चित्रपटाती जब्या आणि शालूच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर खास छाप पाडली. या दोघांची खूप चर्चा झाली.
फँड्री चित्रपटात शालूच्या भूमिकेत राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat)दिसली, तर जब्याच्या भूमिकेत सोमनाथ अवघडे (Somnath Awghade). या दोघांची जोडी फार हिट झाली.
फोटोमध्ये राजेश्वरी पिवळ्या साडीत आणि सोमनाथ अवघडे पांढऱ्या कुर्त्यामध्ये दिसत आहे. दोघांच्या डोक्याला मुंडावळ्या बांधलेल्या दिसत आहेत. त्यांच्यासमोर कुंकवाचा करंडा आणि एका ताटात हळत दिसत आहे.
राजेश्वरी आणि सोमनाथ यांचा मुंडावळ्या बांधलेला लग्नमंडपातील पाहता त्यांच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत. आता तिच्या घोषणेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.