In Pics : 'शालू'चा हटके अंदाज, राजेश्वरी खरातचा नवा लूक व्हायरल...

(photo courtesy : @rajeshwariofficial instagram)
1/7
दिग्दर्शक नागराज मंजुळेंचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठी चित्रपट फॅन्ड्री आल्यानंतर जब्या आणि शालूची लव्हस्टोरी मोक्कार गाजली. . (photo courtesy : @rajeshwariofficial instagram)
2/7
ही साधीभोळी, सोज्वळ शालू अर्थात अभिनेत्री राजेश्वरी खरात आपल्या सौदर्याने चाहत्यांना भुरळ पाडत आहे. तिचा बदललेला लूक पाहून चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. (photo courtesy : @rajeshwariofficial instagram)
3/7
राजेश्वरीने आपल्या सहज सुंदर अभिनयाने फॅन्ड्री चित्रपटात उत्कृष्ट काम केलं. आपल्या अभिनयाने तिने चाहत्यांच्या मनावर ठसा उमटवला. (photo courtesy : @rajeshwariofficial instagram)
4/7
शालूचं पात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी मेहनत घेणारी शालू आता प्रचंड बदलली आहे. 'फँड्री' चित्रपटात अत्यंत साधी दिसणारी राजेश्वरी आता मात्र ग्लॅमरस आणि हॉट अंदाजात चाहत्यांसमोर आली आहे. (photo courtesy : @rajeshwariofficial instagram)
5/7
राजेश्वरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमी आपले सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (photo courtesy : @rajeshwariofficial instagram)
6/7
तिचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले असून त्यावर अनेक कमेंट्सदेखील येत आहेत. राजेश्वरी नेहमीच इन्स्टाग्राम, फेसबुकवर तिचे फोटो नेहमी शेअर करत असते. या फोटोंनी तिने रसिकांची मने जिंकली आहेत. (photo courtesy : @rajeshwariofficial instagram)
7/7
सध्या तिचे निळ्या ड्रेसवरील फोटो व्हायरल झाले आहेत. तिचे फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर लाखांवर फॉलोवर आहेत. (सर्व छायाचित्रं- राजेश्वरी खरातच्या इन्स्टाग्रामवरुन साभार)(photo courtesy : @rajeshwariofficial instagram)
Published at : 30 Jun 2021 07:18 PM (IST)