Wedding Album : मंदिरा बेदीने 22 वर्षांपूर्वी राज कौशलशी कुटुंबाच्या विरोधात जाऊन केलं होतं लग्न
बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदी हिचे पती राज कौशल यांचे निधन झाले आहे. राज कौशल यांचे आज (बुधवारी 30 जून) सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. (photo courtesy : @rajkaushal instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअशा परिस्थितीत संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. विशेषत: मंदिराला सांभाळणे यावेळी कुटुंबासाठी एक मोठे आव्हान असल्याचे सिद्ध होत आहे.(photo courtesy : @rajkaushal instagram)
पतीच्या जाण्याने मंदिरा पूर्णपणे तुटली आहे. मंदिराने कुटुंबाच्या विरोधात जाऊन राज कौशलशी लग्न केले होते. (photo courtesy : @rajkaushal instagram)
दोघांच्या लग्नाला 22 वर्ष पूर्ण झालेत. राज कौशल आणि मंदिरा बेदी यांना दोन मुलेही आहेत.(photo courtesy : @rajkaushal instagram)
मंदिरा बेदी आणि राज कौशल यांची 1996 साली मुकुल आनंदच्या घरी भेट झाली. मंदिरा तेथे ऑडिशनसाठी पोहोचली आली होती आणि राज मुकुल आनंदचा सहाय्यक म्हणून काम करत होता. येथूनच दोघांचे प्रेम सुरू झाले.(photo courtesy : @rajkaushal instagram)
मंदिरा बेदीने 14 फेब्रुवारी 1999 रोजी राज कौशलशी लग्न केले. खरंतर मंदिराच्या आई-वडिलांची इच्छा होती की तिचे लग्न एखाद्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाशी करावे. (photo courtesy : @rajkaushal instagram)
पण दोघांच्या प्रेमापुढे कोणीही उभे राहू शकले नाही.(photo courtesy : @rajkaushal instagram)
राज कौशल व्यवसायाने निर्माता व स्टंट दिग्दर्शक होते. राजने एक अभिनेता म्हणून करिअरची सुरुवात केली होती. राज कौशलने आपल्या कारकीर्दीतील तीन चित्रपट 'प्यार में कभी कभी', 'शादी का लड्डू' आणि 'अँथनी कौन है' हे तीन चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.(photo courtesy : @rajkaushal instagram)