Rahul Vaidya Disha Parmar New Car: अभिनेता राहुलने घेतली ड्रीम कार, किंमत वाचून व्हाल थक्क!
गायक आणि अभिनेता राहुल वैद्य सध्या त्याच्या टीव्ही शोमुळे नव्हे तर त्यांने घेतलेल्या लग्झरी कारमुळे चर्चेत आहे.

गायक आणि अभिनेता राहुल वैद्य आणि त्याची पत्नी दिशा परमार यांनी एक लग्जरी कार विकत घेतली आहे. त्या कारचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
1/7
राहुलने आपल्या ड्रीम कारसोबत तसेच आपल्या पत्नीसोबत फोटो काढले आहेत. अभिनेता राहुलने ब्लॅक कलरची पॅन्ट तसेच व्हाईट टीशर्ट आणि त्यावर डेनिम शर्ट परिधान केला आहे. ( P.C rahulvaidyarkv )
2/7
त्यांनी खरेदी केलेल्या या कारची किंमत 2 कोटी रुपये आहे. त्याने या कारचे फोटो त्याच्या इन्स्टाग्राम खात्यावर शेअर केले आहे. त्या फोटोंमध्ये राहुल आपल्या कारची चावी घेत असल्याचं दिसत आहे. ( P.C rahulvaidyarkv )
3/7
राहुलने कारचे फोटो शेअर करुन त्या फोटोंना छान असे कॅप्शन दिले आहे. 'नवीन कार...सर्व शक्तिशाली लोक, आई- वडिलांचा आशीर्वाद आणि मुलीने सोबत आणलेल्या नशीबाला धन्यवाद' अशा भावना राहुलने व्यक्त केल्या आहेत. ( P.C rahulvaidyarkv )
4/7
राहुल वैद्य आणि दिशा परमार ही जोडी सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. या दोघांनी नुकतीच रेंज रोव्हर ही महागडी कार खरेदी केली असून त्यांनी या कारचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ( P.C rahulvaidyarkv )
5/7
2023 साली राहुल वैद्य आणि पत्नी दिशा परमार यांना गोड मुलगी झाली. ( P.C rahulvaidyarkv )
6/7
राहुल आणि दिशा या जोडीने आपल्या मुलीचे नाव नव्या ठेवलं आहे. ही जोडी सोशल मीडियावर आपल्या मुलीचे फोटो शेअर करत असते. ( P.C rahulvaidyarkv ).....
7/7
या फोटोमध्ये राहुल आपली पत्नी दिशा परमार आणि मुलगी नव्यासोबत दिसतोय. दिशा परमार ही टीव्ही अभिनेत्री आहे. ( P.C rahulvaidyarkv )
Published at : 05 Aug 2024 11:03 AM (IST)