Shravan 2024 Bhimashankar : आज पहिल्या श्रावणी सोमवारी भीमाशंकर फुललं; भरपावसात महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, पाहा फोटो
श्रावण महिन्याचा पहिला सोमवार व्रतलैकल्यांचा असून हा सर्वात महत्वाचा मानला जातो. आज पहिल्या श्रावणी सोमवारी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या पुण्यातील श्री क्षेत्र भिमाशंकरला देखील पहाटेची महाआरती करण्यात आली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावेळी मुख्य शिवलिंगाला भस्म चोळण्यात आला.
बेल-भंडारा वाहून शिवलिंगाची पूजा करण्यात आली.
पहाटेच्या सुमारास भीमाशंकर मंदिरातील पूजाऱ्यांनी महादेवाच्या पिंडीची विधीवत पूजा पार पाडली.
शिवपिंड फुलांच्या आरासांनी सुंदर अशी सजवण्यात आली.
यानंतर पुण्यातील ज्योतिर्लिंग भीमाशंकर येथे पहाटेची आरती पार पडली.
दुग्धाभिषेक, डमरु आणि शंखनाद केल्यानंतर भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात आलं.
श्रावण महिना शिवशंकराच्या पूजेसाठी समर्पित असतो. यंदा श्रावणाची सुरुवात सोमवारपासून झाली. तब्बल 71 वर्षांनी हा योग आला असल्याने या महिन्याचं महत्त्व विशेष आहे.
श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांनी श्रीक्षेत्र ज्योतिर्लिंग भीमाशंकर येथे दर्शनासाठी गर्दी केली.
सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत वसलेलं भिमाशंकर देवस्थान,बारा ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रातील सहाव्या ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.
हिरव्यागर वातावरणात,पांढऱ्या शुभ्र धुक्यात वेढलेला हा परिसर रिमझिम पावसात न्याहाळुन गेला आहे.
याच वातावरणात भाविकांच्या लांबच लांब रांगा पहाटेपासून लागल्या आहेत. भर पावसात रेनकोट घालून भाविक पहाटेपासून दर्शनरांगेत उभे आहेत.
पहाटेपासून शिस्तबद्ध पद्धतीत दर्शन सुरु आहे.
सर्व जाती धर्माच्या सीमा पार करत देशभरातील भाविक भिमाशंकरला दाखल झाले आहेत.
हर हर महादेव ,ॐ नम: शिवाय असा गजर करत श्रावण महिन्याचा आज शुभारंभ झाला आहे.
भीमाशंकर मध्येही सध्या हाच उत्साह पाहायला मिळत आहे.